Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लग्न झाल्यानंतर महिन्याभरातच का आहे किश्वर मर्चंट नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 11:03 IST

किश्वर मर्चंट आणि सुयश रायने नुकतेच 16 डिसेंबरला लग्न केले. या दोघांची ओळख प्यार की यह एक कहानी या ...

किश्वर मर्चंट आणि सुयश रायने नुकतेच 16 डिसेंबरला लग्न केले. या दोघांची ओळख प्यार की यह एक कहानी या मालिकेच्या सेटवर झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या सहा वर्षांपासून ते दोघे नात्यामध्ये आहेत. किश्वर ही सुयशपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. पण याचा त्यांच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही. ते दोघे बिग बॉस या कार्यक्रमातही आले होते. त्यावेळीदेखील त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. अनेक वर्षांच्या नात्यानंतर किश्वर आणि सुयशने अगदी साध्यापणाने कोर्टात लग्न केले. लग्न धामधुमीत न करण्याचे त्यांनी ठरवले असले तरी त्यांनी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात केला. तसेच त्यांच्या इंडस्ट्रीमधील मित्रमैत्रिणींसाठी त्यांनी एक रिसेप्शनदेखील दिले होते. त्यांनी लग्नानंतर कपल टॅटूदेखील काढला आहे. त्यांच्या लग्नाला केवळ एकच महिने झाले असले तरी सध्या किश्वर चांगलीच नाराज आहे.किश्वर आणि सुयशमध्ये लग्नाच्या महिन्याभरातच काही ताणतणाव निर्माण झाले का? असा विचार तुम्ही करत असाल तर ते चुकीचे आहे. किश्वर सुयशवर नाही तर एका ज्वेलरीवाल्यावर नाराज आहे. किश्वरला लग्नात सुयशने एक खूप छान हिऱ्याची अंगठी दिली होती. पण महिन्याभरातच या अंगठीचे हिरे पडू लागले आहेत. तिने अंगठी दुरुस्तीसाठी टाकली असून दहा दिवस झाले असले तरी तिला अंगठी परत मिळाली नाही. किश्वरने याबाबत एक ट्वीट केले आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "महिन्याभरातच माझ्या अंगठीचे डायमंड पडू लागले आहेत. दहा दिवस झाले तरी दुरुस्तीसाठी दिलेली अंगठी परत मिळालेली नाही. या ज्वेलरीवाल्यांना लोकांच्या इमोशनबद्दल काही देणंघेणं असते की नाही?"