Join us

‘गोपी बहू’च्या कपाळावर का पडले दहा टाके ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 12:26 IST

छोट्या पडद्यावरील गोपी बहू अर्थात 'साथ निभाना साथियाँ' फेम देवोलिना भट्टाचार्जी जखमी झालीय. देवोलिना आपल्या बिल्डिंगमधल्या पाय-यावर घसरुन पडलीय. ...

छोट्या पडद्यावरील गोपी बहू अर्थात 'साथ निभाना साथियाँ' फेम देवोलिना भट्टाचार्जी जखमी झालीय. देवोलिना आपल्या बिल्डिंगमधल्या पाय-यावर घसरुन पडलीय. यामुळं तिच्या कपाळावर जखम झाली असून दहा टाकेही पडलेत. साथ निभाना साथियाँ मालिकेतील गोपीची भूमिका पाहता देवोलिनाला मालिकेचं शुटिंग सुरुच ठेवावं लागणार आहे. देवोलिनाची सध्याची परिस्थिती पाहता मालिकेतही ती जखमी झाल्याचा सीन दाखवण्यात येणार आहे.खुद्द देवोलिनानंही आपण जखमी झाल्याचं सांगितलंय.