Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सई लोकरू रेशम टिपणीसला का म्हणाली डायन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 11:34 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल WEEKEND चा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रंगला. काल बिग बॉस मराठीच्या घरामधून ...

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल WEEKEND चा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रंगला. काल बिग बॉस मराठीच्या घरामधून कोणीच घराबाहेर जाणार नव्हते परंतु हे फक्त प्रेक्षकांना माहीत असून घरातील सदस्य या गोष्टीस अनभिज्ञ होते. त्यामुळे काल आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये सुशांत, सई आणि मेघा आले. मेघाने रेशम आणि बाकीच्या सदस्यांच्या मनामध्ये असलेल्या आणि बोलून दाखवलेल्या बऱ्याच गोष्टींची उत्तरे दिली. त्यानंतर सुशांत, सई आणि मेघा हे तिघे डेंजर झोनमध्ये असल्याचे सांगितले. सुशांत सुरक्षित असून मेघा आणि सई मधून कोणी तरी एक या आठवड्यामधून घराबाहेर जाणार असून सई सुरक्षित असून मेघाला जावे लागणार असे सांगितले. त्यामुळे पुष्कर, आऊ आणि सई या सगळ्यांच रडू कोसळले. परंतु काही वेळानंतर महेश मांजरेकर यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि या आठवड्यामध्ये कोणीही घराबाहेर जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे मेघा आणि बाकी सगळे देखील खुश झाले. परंतु या निर्णयाने आज कोणामध्ये वाद होणार? कोणाला ही गोष्ट रुचली नाही? हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.आज बिग बॉस मराठीचे घर पाळणा घर बनणार असून बिग बॉस घरामधील सदस्यांना “बाबा गाडी घराबाहेर काढी” हे नॉमिनेशन कार्य देणार आहे. या कार्याअंतर्गत घरातील गार्डन एरियाचे पाळणा घरामध्ये रूपांतर केले जाणार आहे. या कार्यामध्ये घरातील सर्व सदस्य बेबीसीटरची भूमिका साकारतील. घरामध्ये आलेले नवे सदस्य त्यागराज, शर्मिष्ठा आणि घराची कॅप्टन मेघा या प्रक्रियेपासून सुरक्षित असणार आहेत. हे तीन सदस्य या कार्यामध्ये सहभाग घेणार नाहीत. मात्र रणनीती वजा योजना आखायची असल्यास घरातील सदस्य त्यांची मदत घेऊ शकतात. या कार्यामध्ये घरातील सदस्यांना एक बाबा गाडी देण्यात येणार आहे. यामध्ये असलेल्या बाहुली भोवती या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया रंगणार आहे. या कार्यामध्ये बेबीसीटर त्यांना दिलेल्या बाहुल्या सांभाळतील. या बाबा गाडीमधील बाहुलीवर घरातील इतर सदस्यांचा फोटो असेल. त्यामुळे हे कार्य कसे रंगेल? कोण आज नॉमिनेट होईल? हे बघणे रंजक असणार आहे.कार्यामध्ये जुई आणि आस्तादमध्ये देखील थोडासा वाद रंगणार आहे. सई कार्यामध्ये बाहुलीला गोष्ट सांगणार आहे, ज्यामध्ये ती रेशमला डायन म्हणार आहे. आणि बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कसे रेशम तिच्याशी भांडते, नॉमिनेशन मध्ये कसे रेशम तिचे नाव घेते, सई बाकी सगळ्यांना आवडते. पण रेशमला आवडत नाही हे बाहुलीला सांगणार आहे. त्यामुळे घरात आता वाद निर्माण होणार आहे. Also Read : ​बिग बॉस मराठीची स्पर्धक शर्मिष्ठा राऊतने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी केला हा मोठा उलगडा