लिपस्टिक अंडर माय बुरखा हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला आहे. या चित्रपटातील ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अनेक किसिंग आणि इंटिमेट सीन पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत देखील अडकला होता. पण या चित्रपटाला बॉलिवूडमधील आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक, पलबिता बोरठाकूर, आहाना कुमरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबीने देखील लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटाला पाठिंबा नोंदवला आहे. तिने या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी तिचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोची सध्या चांगलीच चर्चा आहे. या फोटोसोबत तिने खूप चांगली पोस्ट देखील लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते म्हणत आहेत की, त्या मुली तुम्ही बनू नका... त्या बायका... घटस्फोटीत बायका... मुलांना एकट्या सांभाळणाऱ्या बायका... पण मी तशी एक स्त्री आहे... मी दरवेळी ज्या ज्या वेळी लिपस्टिक लावते, त्यावेळी एक हास्य माझ्या चेहऱ्यावर येते. कारण मी माझ्या स्वतःशी खरी आहे. माझ्या मतांशी जग सहमत असो अथवा नसो माझे एक वेगळे जग मी बनवले आहे...