Join us  

इतनी क्यूँ तुम खुबसुरत हो! ज्ञानदाचा इंडो-वेस्टर्न लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 2:16 PM

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

उत्तम अभिनयकौशल्य आणि स्वभावातील मस्तीखोरपणा यामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर.  ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अपूर्वा ही मध्यवर्ती भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली. ज्ञानदाचा सोशल मीडियावरही तगडा चाहतावर्ग आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अलिकडेच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ज्ञानदाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने इंडो-वेस्टर्न लूक कॅरी केला आहे.  पैठणीपासून तिचा हा लूक तयार करण्यात आला आहे. सोबतच तिने त्याला साजेसा मेकअपही केला आहे. त्यामुळे सध्या तिच्या या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

दरम्यान, ज्ञानदाची मुख्य भूमिका असलेली ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अलिकडेच ज्ञानदाने मालिकेच्या सेटवरचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला होता. ही मालिका संपत असल्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी