Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन का झाले भावूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 12:30 IST

कौन बनेगा करोडपती आणि अमिताभ बच्चन हे एक प्रकारचे जणू समीकरणच बनले आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा अमिताभ ...

कौन बनेगा करोडपती आणि अमिताभ बच्चन हे एक प्रकारचे जणू समीकरणच बनले आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा अमिताभ बच्चन यांच्याशिवाय लोक विचार देखील करू शकत नाहीत. या कार्यक्रमाने केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावरही अमिताभ बच्चन यांना स्टारडम मिळवून दिले. अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासून सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाच्या काही सिझनचे सूत्रसंचालन शाहरुख खानने देखील केले आहे. पण शाहरुख खानला अमिताभ यांच्या इतके प्रेक्षकांचे प्रेम मिळाले नाही. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नववा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११ ऑक्टोबला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असून ते यादिवशी ७५ वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या आधीच त्यांचा वाढदिवस कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर खूपच चांगल्याप्रकारे साजरा करण्यात आला. अमिताभ बच्चन यांना या कार्यक्रमाच्या टीमने खूप चांगले सरप्राईज दिले.अमिताभ बच्चन यांचे शिक्षण नैनितालच्या शेरवुड कॉलेजमध्ये झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा हा खास व्हिडिओ बनवण्यात आला. हा व्हिडिओ पाहून बच्चन खूपच खूश झाले. कॉलेजमधील आठवणींचे विवध आकारचे खूप सारे पोस्टर्स देखील बनवण्यात आले होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण टीमसाठी एक गाणे गायले. तसेच कौन बनेगा करोडपतीने गेल्या १७ वर्षांत त्यांना दिलेल्या प्रेमासाठी आणि खूप साऱ्या आठवणींसाठी टीमचे आभार मानले.अमिताभ बच्चन हा व्हिडिओ पाहाताना आपले महाविद्यालय पाहून खूप आनंदित झाले होते. तसेच मुलांचा हा व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन प्रचंड भावूक झाले होते. हा व्हिडिओ पाहाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. सेटवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी देखील अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अमिताभ बच्चन यांचे आवडते गिटार वादक निलादरी कुमार यांनी बच्चन यांच्यासाठी वाढदिवसाचे खास गाणं सादर केले.Also Read : विनोद खन्ना यांना अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मिळायचे अधिक मानधन