Join us

'या' कारणामुळे अभिजीत बिचुकलेच्या डोळ्यात आले पाणी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 13:47 IST

आजदेखील घरामध्ये तो नेहा, शिवानी आणि आरोहला घडलेला एक मजेदार किस्सा सांगणार आहे आणि त्याच्या डोळ्यात पाणी का आणि कोणामुळे आले हे देखील सांगणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात बिचुकले आणि त्याचे किस्से खूपच प्रसिध्द आहेत. प्रत्येक घडलेली घटना रंगतदार पध्दतीने सांगण्याचे कौशल्य त्याच्यामध्ये आहे. आजदेखील घरामध्ये तो नेहा, शिवानी आणि आरोहला घडलेला एक मजेदार किस्सा सांगणार आहे आणि त्याच्या डोळ्यात पाणी का आणि कोणामुळे आले हे देखील सांगणार आहे. बिचुकले टेंशनमध्ये असताना त्याला विसर पडला की त्याची पत्नी त्यांच्यासोबत आहे आणि ते  पत्नीला पेट्रोल पंपावर विसरून पुढे एक किलोमीटर आले. पेट्रोल भरण्यासाठी बिचुकले खाली उतरला आणि परताना मात्र बायकोला विसरून पुढे गेला. बिचुकले म्हणाला,‘मी खूप टेंशनमध्ये होतो त्यामुळे मी तिला पेट्रोल पंपावरती सोडून पुढे गेलो”... आणि हे सांगितल्यावर शिवानी म्हणाली हाणला असेल ना तुम्हाला ? बिचुकले पुढे म्हणाला, ‘एक माणूस गाडीतून पुढे आला आणि आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघत होता मला कळेच ना काय झाले. परत तसेच घडले एक जोडपं आलं आणि हसून पुढे गेलं. माझ्या ओळखीचे आहेत तरी असे का बघत आहेत हे कळत नव्हतं, म्हणून मी मागे वळून बघितले तर माझी बायकोच मागे नव्हती क्षणभर मला कळाले नाही काय करू आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले होते.

शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांच्यामध्ये वाद  झाला.  किशोरी शहाणे यांचे म्हणणे होते, “तुम्ही बोलता म्हणजे असं नाही की मी विश्वास ठेवते”. अभिजीत बिचुकले शिवानीला असे म्हणाले, “आपण दोघे जिथून आलो आहे ना” या वाक्यावर शिवानी भडकली आणि म्हणाली की “कुठून आलो आहे आपण दोघे ? त्यावर बिचुकलेचे म्हणणे होते “आपण सुट्टीवरून आलो आहे ना”. या म्हणण्यावर शिवानीचा पारा अजूनच चढला ती पुढे  म्हणाली, “मूर्ख माणूस, कुठे गेला होतात ? गप्प बसा. अभिजीत बिचुकले कोणाच्या म्हणण्यावर गप्प बसतील हे कठीणच.

टॅग्स :अभिजीत बिचुकलेबिग बॉस मराठी