Join us

बाजी कोण मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 15:43 IST

ब्रम्हराक्षस या मालिकेत क्रिस्टल डिसोझा, रक्षंदा खान, किश्वर मर्चंट प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या नावावरूनच या मालिकेत खलनायक ...

ब्रम्हराक्षस या मालिकेत क्रिस्टल डिसोझा, रक्षंदा खान, किश्वर मर्चंट प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या नावावरूनच या मालिकेत खलनायक कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या मालिकेतील खलनायक हा अभिनयात चांगला असण्यासोबतच त्याची शरीरयष्ठीही अतिशय चांगली असावी असे निर्माती एकता कपूरचे म्हणणे आहे. त्यामुळे निकितिन धीर, राहुल देव आणि चेतन हंसराज या कलाकारांचा या भूमिकेसाठी विचार करण्यात येत आहे. या तिघांमध्ये आता बाजी कोण मारतेय हे येणारा काळच ठरवेल.