Join us

कोण होईल मराठी करोडपती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 19:17 IST

 सुमारे दोन वर्षांपूर्वी कलर्स मराठीने मोठ्या थाटात कोण होईल मराठी करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षांसाठी आणला. या कार्यक्रमाने मराठी प्रेक्षकांना ...

 सुमारे दोन वर्षांपूर्वी कलर्स मराठीने मोठ्या थाटात कोण होईल मराठी करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षांसाठी आणला. या कार्यक्रमाने मराठी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले.या कार्यक्रमाच्या मागील दोन सीझनला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती तिसºया सिझनची. हल्लीच कलर्स मराठी वाहिनीने प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम कोण होईल मराठी करोडपती आपल्या तिसºया सिझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सांगितले. मराठी प्रेक्षक कोण होईल मराठी करोडपतीच्या तिसºया सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या सिझनच्या यशानंतर दुसºया सिझन मध्ये जोडी-स्पेशल हा वेगळा प्रयोग करण्यात आला होता. आता तिसºया सिझन मध्ये काय घडणार या बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पहिल्या दोन सिझन पेक्षा हा सिझन अगदी वेगळा असणार असल्याचे वाहिनीच्या सूत्रांकडून समजले.