रात्रीस खेळ चाले ही मालिका काहीच दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नेने आणि अजय यांचा खून कोणी केला हे अद्याप तरी कळलेले नाही. संशयाची सुई सध्या नाईक कुटुंबातील अनेकांवर फिरत आहे. काही दिवसांपूर्वी निलिमा आणि सुषमा यांना पोलिसांनी पकडल्याचे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर फिरत होते. त्यामुळे निलिमा आणि सुषमाच दोषी असल्याचे सगळ्यांना वाटत होते. पण आता या मालिकेचे निर्माते संतोष अयाचित यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर तीन फोटो शेअर केले आहे. यातील एका फोटोत गुरव तर दुसऱ्या फोटोत अभिराम तर तिसऱ्या फोटोत दत्ताला पोलिसांनी अटक केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारासोबत या मालिकेचा वेगवेगळा शेवट चित्रीत केला गेला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता हे तरी खरे गुन्हेगार आहेत का हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळण्याासाठी आपल्याला काही दिवस नक्कीच वाट पाहावी लागणार आहे.
कोण आहे खरा गुन्हेगार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:07 IST