Join us

सबसे स्मार्ट कौन? या कार्यक्रमात झळकणार हे स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 18:06 IST

सबसे स्मार्ट कौन? या कार्यक्रमात गरिमा आणि मोनिका या दोन मैत्रिणी स्पर्धकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कार्यक्रमाच्या तीन फेऱ्यांपर्यंत त्यांचा स्कोर हा दुसऱ्या टीमप्रमाणेच असणार आहे.

स्टार प्लसने नुकताच सबसे स्मार्ट कौन? हा आगळा वेगळा शो सुरू केला आहे. स्पर्धकांना त्यांच्या सामान्य ज्ञान आणि स्मार्टनेससाठी या कार्यक्रमाद्वारे पुरस्कृत केले जाते. एवढेच नाही तर हा शो घरी बसून पाहणाऱ्या लोकांनाही हॉट स्टार या अॅपवर सबसे स्मार्ट कौन प्ले अलाँगसोबत दररोज बक्षिसे जिंकण्याचीही संधी देतो. त्यामुळे हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांना हा कार्यक्रम चांगलाच आवडत आहे. छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता रवी दुबे या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. या आठवड्‌यात आपल्या स्मार्टनेस आणि खिलाडू वृत्तीसह प्रेक्षकांचे मनोरंजन करायला मुंबई आणि पुणे येथील सुपरमॉम्स येणार आहेत.

सबसे स्मार्ट कौन? या कार्यक्रमाचा हा खास भाग नुकताच चित्रीत करण्यात आला. या कार्यक्रमातील या सुपर मॉम्स आपले घर, कुटुंब सांभाळून आपल्या आवडीनिवडीसुद्धा जपत आहेत. पुणे येथील गरिमा गुप्ता आणि मोनिका दुलारे या खास मैत्रिणी आहेत. त्या दोघांचे लग्न झालेले असून त्या गृहिणी आहेत. पण त्याचसोबत मोनिका एक बाईकर असून ती बेकिंगही करते आणि ती बनवत असलेले केक, बिस्किटं यांची विक्री देखील करते तर गरिमा ही एक शेफ असून तिचे स्वतःचे युट्‌यूब चॅनल आहे. सर्वोत्तम शेफ म्हणून तिला मल्लिका ए किचन हा पुरस्कार देखील मिळालेला आहे.

सबसे स्मार्ट कौन? या कार्यक्रमात गरिमा आणि मोनिका या दोन मैत्रिणी स्पर्धकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कार्यक्रमाच्या तीन फेऱ्यांपर्यंत त्यांचा स्कोर हा दुसऱ्या टीमप्रमाणेच असणार आहे. पण तिसऱ्या फेरीच्या अखेरीस मुंबईच्या टि्‌वंकल आणि पायल जॅकपॉट राऊंडसाठी पुढे जाणार असून त्या ४.३२ लाख रुपये जिंकणार आहेत.

गरिमा आणि मोनिका सबसे स्मार्ट कौन या कार्यक्रमाच्या विजेत्या बनल्या नसल्या तरी त्यांची गोष्ट अन्य महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल असे या कार्यक्रमाच्या टीमचे म्हणणे आहे. 

टॅग्स :सबसे स्मार्ट कौनरवि दुबे