एमयुपी बँकेत कोणी टाकला दरोडा ? सहाजणी नेमक्या कोणाला पकडतात जाणून घ्या या थरारनाट्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 16:19 IST
एमयुपी बँकेत दिवाळीचा सेलिब्रेशन होत असताना अचानक तीन दरोडेखोर बँकेत घुसतात. विशेष म्हणजे बँकेत दरोडा पडल्याचे कळताच पोलिसही तिथे ...
एमयुपी बँकेत कोणी टाकला दरोडा ? सहाजणी नेमक्या कोणाला पकडतात जाणून घ्या या थरारनाट्याविषयी
एमयुपी बँकेत दिवाळीचा सेलिब्रेशन होत असताना अचानक तीन दरोडेखोर बँकेत घुसतात. विशेष म्हणजे बँकेत दरोडा पडल्याचे कळताच पोलिसही तिथे येतात. त्यानंतर चोर आणि पोलिसांचे थरारनाट्य सुरु होते. या थरारनाट्यात पोलीस दरोडेखोऱ्यांना पकडण्यात यशस्वी होतात का ? मालिकेतील सहाजणी या प्रसंगाला कशा सामोऱे जातात हे येणा-या भागात पाहायला मिळणार असून. या सहाजणी नेमक्या कोणाला पकडतात, नेहमीच काहीतरी गोंधळ करत बँकेत समस्या निर्माण करणाऱ्या या सहा मैत्रिणीमुळे नेमका कोणाला फायदा होतो याचाही उलगडा होताना दिसणार आहे. चोर-पोलिसांचा हा मजेशीर भागात पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, गणेश रेवंडेकर आणि चंदू बारशिंगे हे कलाकार रसिकांना लोडपोट हसवण्यासाठी लवकरच येणार आहेत. या बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिकेत गिरीजा ओक ‘विद्या विसपुते’ची भूमिका साकारत आहे. बँकेची ब्रांच हेड असलेली विद्या विसपुते साधी, सरळ आणि समजूतदार अधिकारी आहे. बँकेतल्या लोकांनी चुका कराव्यात आणि तिने उदार मनाने त्या सांभाळून घ्याव्यात अशी तिची भूमिका रेखाटण्यात आली आहे. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची ‘गं सहाजणी’ ही कलाकृती निखळ आनंद देणारी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. गिरीजा ब्रांच हेड असलेल्या या बँकेत शर्वणीपिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पौर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोंडवळकर या अभिनेत्री मुख्य पदांवर आहेत. रोजच्या जीवनातील दगदग, समस्या आणि नोकरीवर जाणाऱ्या महिलांचं भावविश्व मांडणारी ही मालिका आहे.