Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवा रावण कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:33 IST

हनुमान या मालिकेत आर्य बब्बर रावणाची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आर्यकडे ...

हनुमान या मालिकेत आर्य बब्बर रावणाची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आर्यकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स असल्याने मालिकेचे चित्रीकरण करणे त्याला शक्य होत नाहीये. त्यामुळे त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आर्य सांगतो, "ही मालिका, माझी भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. पण मी पुढच्या तारखा आधीच दिल्या असल्याने या मालिकेचा मला निरोप घ्यावा लागत आहे." आर्य बब्बरने मालिका सोडल्यानंतर महाभारत या मालिकेत भीमची व्यक्तिरेखा साकारलेल्या सौरव गुजरचा रावण या भूमिकेसाठी विचार करण्यात येत आहे. सौरवने या भूमिकेसाठी लुक टेस्टही दिली असल्याची चर्चा आहे.