Join us

अभिनयक्षेत्रात असताना कोणतीच बंधन स्वत:वर लादु नये- कृतिका कामरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 11:05 IST

प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं..आणि ते आपोआप होतं असं आम्ही नाही तर टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा ...

प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं..आणि ते आपोआप होतं असं आम्ही नाही तर टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा म्हणते आहे. त्याचं झालं असं की,रिअल नाही तर रिल लाईफमध्ये या दोघे ऑनस्क्रीन आपले प्रेम व्यक्त करताना दिसतायेत.‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’मध्ये चंद्रकांता आणि राजपुत्र वीरेन्द्रसिंह भूमिका साकारणारे कृतिका कामरा आणि गौरव खन्ना यांनी परस्परांतील प्रेमाचे दर्शन घडवले आहे.सध्या अनेक टीव्ही अभिनेत्रीं मालिकेत हॉट सीन्स करणार नसल्याचे दिग्दर्शकांना सांगतात,मालिकेत तसे सीन्स नसतील तरच ते मालिकेत काम करण्यास होकार देतात. मात्र काही अभिनेत्रींना यांत काही गैर नसल्याचे वाटते. अभिनयक्षेत्रात कसलीच बंधनं स्वत:वर लादु नये असे मत कृतिका कामराने व्यक्त केले आहे.त्याचे झाले असे की, मालिकेत कृतिका आणि गौरववर एक हॉटसीन शूट करण्यात आला होता. यांवर अनेक रसिकांनी नाराजी दर्शवली होती. त्यामुळे दोघांनीही याविषयी आपली मतं मांडली आहे.“टीव्हीवरील आमच्यातील नात्याबद्दल म्हणाल,तर टीव्ही मालिकेत प्रणयी जोडपे साकारण्याचा आम्हाला अनुभव आहे.असे प्रसंग आम्ही व्यावसायिकदृष्ट्य़ा साकारतो.आम्ही त्या भूमिकांच्या अंतरंगात शिरतो आणि मग आमच्यातील प्रेमभावना आमच्या अभिनयतून पडद्यावर मांडत असतो'' असे कृतिका म्हणाली.त्यांच्यातील नाते पडद्यावर इतके वास्तव कसे वाटते, असे विचारल्यावर गौरवने सांगितले, “आम्ही दोघेही व्यावसायिक अभिनेते आहोत आणि आता टीव्ही मालिकांच्या क्षेत्रातही बराच काळ कार्यरत आहोत. सह-कलाकार म्हणून आमच्यात चांगलं नातं निर्माण झालं आहे. दोघांचे संवाद काय आहेत, त्यातील संवेदनशील भाग कोणता आहे हे आम्ही लक्षात घेतो.आमच्यातील या समजुतदारपणाचं प्रतिबिंब त्यात पडतं.आम्हालाही त्यात काही अवघडल्यासारखं वाटत  नसल्याचे गौरव सांगतो, “आमच्यातील हे समजुतदार नातं हेसुध्दा या मालिकेचं एक मोठं वैशिष्ट्य़ आहे. जसजशी मालिका पुढे सरकेल, तसतसं मालिकेतील वेगेवगळे पैलु उलगडत जातील.”