Join us  

Sakshi Tanwar Birthday: 17 मिनिटांचा तो इंटिमेट सीन देताना अशी झाली होती साक्षी तन्वरची अवस्था...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 8:00 AM

Sakshi Tanwar Birthday: कहानी घर घर की, बड़े अच्छे लगते हैं यासारख्या मालिकेतून अभिनेत्री साक्षी तन्वर घराघरांत पोहोचली. आजही टीव्हीची पार्वती याच नावाने ती ओळखली जाते. आज साक्षीचा वाढदिवस...

कहानी घर घर की, बड़े अच्छे लगते हैं (Bade Acche Lagte Hain) यासारख्या मालिकेतून अभिनेत्री साक्षी तन्वर घराघरांत पोहोचली. आजही अगदी आपल्याच कुटुंबातील एक सदस्य असावी, याप्रमाणे चाहते तिच्यावर प्रेम करतात. आजही टीव्हीची पार्वती याच नावाने ती ओळखली जाते. आज साक्षीचा वाढदिवस ( Sakshi Tanwar Birthday). साक्षीने कधीच वयाची चाळीशी ओलांडली. पण आजही ती अविवाहित आहे. 

12 जानेवारी 1973 रोजी राजस्थानच्या अलवर येथे साक्षीचा जन्म झाला. साक्षी रिल लाईफमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही प्रचंड सिंपल आहे. पण 2011 मध्ये  तिचं एक वेगळंच रूप प्रेक्षकांना पाहायला  मिळालं होतं. त्यावर्षी बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे साक्षी प्रचंड चर्चेत आली होती.  

बडे अच्छे लगते है मालिकेतून राम कपूर (Ram Kapoor) व साक्षी तन्वर (Sakshi Tanwar) ही जोडी लोकप्रिय ठरली. याच मालिकेत या जोडीने छोट्या पडद्यावरचा सगळ्यात बोल्ड सीन दिला होता. मालिकेत राम आणि साक्षीचा एक इंटिमेंट सीन चित्रीत करण्यात आला होता. त्याआधी कधीही मालिकेत इतका बोल्ड सीन दाखवला गेला नव्हता. साहजिकच या सीनची जबरदस्त चर्चा झाली होती.   मालिकेत राम आणि साक्षी यांचं सुरुवातीला पटत नाही. पण कालांतराने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात असं या मालिकेत दाखवण्यात आलं होतं. त्यांच्यात निर्माण झालेली जवळीक दाखवण्यासाठी साक्षी आणि राम कपूरवर लव्ह मेकिंग सीन्स चित्रीत करण्यात आले होते. एका सीन्सची दीर्घकाळ चर्चा रंगली होती. राम आणि साक्षीवर चित्रीत करण्यात आलेला हा इंटिमेट सीन हा तब्बल 17 मिनिटांचा होता. हा 17 मिनिटांचा इंटिमेट सीन शूट करताना साक्षी अनेकदा अस्वस्थ झाली होती. यामुळे अनेकदा शूटींग मध्येच थांबवावं लागलं होतं. 

हा सीन मालिकेत दाखवल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप देखील नोंदवला होता. मालिका या सगळ्या वयोगटातील लोक घरात एकत्र बसून पाहातात, त्यामुळे अशाप्रकारचे सीन मालिकेत दाखवणे चुकीचं असल्याचं म्हणत अनेकांनी यावर टीका केली होती. या मालिकेची निर्माती एकता कपूरने या काही वर्षांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत हा सीन दाखवून मी चूक केल्याची कबूलीही दिली होती.

राम आणि साक्षीची जोडी बडे अच्छे लगते है या मालिकेनंतर प्रचंड हिट झाली. त्यानंतर करले तू भी मोहोब्बत या वेबसीरिजमध्ये देखील ते दोघे एकत्र झळकले होते. या वेबसीरिजमधील त्यांच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

टॅग्स :राम कपूरटेलिव्हिजनटिव्ही कलाकारएकता कपूर