Join us  

What's In My Bag! संजनाच्या पर्समध्ये कोणत्या वस्तू असतात माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 6:26 PM

Rupali bhosale: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रुपाली भोसले तिच्या पर्समध्ये ती नेमक्या गोष्टी ठेवते आणि, कोणत्या गोष्टी दररोज कॅरी करते हे सांगितलं आहे.

खलनायिकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले (rupali bhosale). अनेकदा मालिका, चित्रपटांमधील खलनायकाची किंवा खलनायिकेची भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांना फारसे आवडत नाहीत. मात्र, रुपालीच्या बाबतीत चित्र थोडसं वेगळं असल्याचं पाहायला मिळतं. 'आई कुठे काय करते' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी रुपाली आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या मालिकेत तिने संजना ही भूमिका साकारली असून तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच अलिकडेच  रुपालीने तिच्या पर्समध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू असतात हे सांगितलं आहे.

अनेकदा चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याकडे चाहत्यांचा कल असतो. यामध्येच अलिकडे 'राजश्री मराठी'च्या एका व्हिडीओमध्ये रुपालीने तिच्या पर्समध्ये कोणत्या वस्तू असतात हे सांगितलं आहे.

संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रुपाली भोसले तिच्या पर्समध्ये ती नेमक्या गोष्टी ठेवते आणि, कोणत्या गोष्टी दररोज कॅरी करते हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये ती परफ्यूम लव्हर असल्याचंही तिने सांगितलं.

"मला नीटनेटकेपणा खूप आवडतो. त्यामुळे मी प्रत्येक वस्तू जागेवर राहिल याची काळजी घेते. माझ्या बॅगला एक लहान पाऊच आहे यात मी गाडीच्या चाव्या, रबर बँड, कल्चर आणि हॅन्डसफ्री ठेवते. त्यानंतर मेन बॅगमध्ये मोबाईल फोन, गॉगल,पॉवर बँक, सनस्क्रीम आणि लहानसं पाकिट आहे, ज्यात थोडेफार पैसे आणि कार्ड्स आहेत. या काही महत्त्वाच्या दररोज लागणाऱ्या गोष्टी असतात", असं ती म्हणाली.पुढे ती म्हणते, "माझ्यासोबत एक लवंग,वेलचीचा डबा असतो. मला च्युइंगमपेक्षा हे नॅचरल माऊथ फ्रेशनर जास्त आवडतं. सोबत काही कॉस्मॅटिक्सही आहेत. ज्यात हॅन्ड क्रीम,लिपबाम, विविध शेड्सच्या लिपस्टिक, मस्कारा, लायनर,फेसमिस्ट, परफ्युम्सच्या बाटल्या आहेत."

दरम्यान, या व्हिडीओमध्ये तिने तिच्या आवडीनिवडींविषयी देखील सांगितलं. त्यानुसार, रुपाली परफ्युम लव्हर असून तिला वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स वापरायला विशेष आवडतात.  

टॅग्स :रुपाली भोसलेसेलिब्रिटीटेलिव्हिजन