Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूत्रसंचालकांच्या बदलीचे काय आहे राज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 12:12 IST

सा रे ग म पा 2016 या म्युझिक रियालिटी शोमध्ये लवकरच तुम्हाला बदल पाहायला मिळणार आहे. हा शो सुरु ...

सा रे ग म पा 2016 या म्युझिक रियालिटी शोमध्ये लवकरच तुम्हाला बदल पाहायला मिळणार आहे. हा शो सुरु झाल्यापासून गायक आदित्य नारायण त्याचं सूत्रसंचालन करत होता. मात्र शोच्या आगामी भागात आदित्य शोचं सूत्रसंचालन करणार नाही. शोचा कालावधी वाढल्याने आदित्यची एक्झिट होणार असून त्याच्या जागी जय भानुशाली आणि अनु कपूर या शोचं सूत्रसंचालन करताना दिसतील. मार्च 2016 मध्ये सुरु झालेला म्युझिक रियालिटी शो 3 जुलैपर्यंत चालणार होता.मात्र या शोची जागा घेण्यासाठी चॅनलकडे सध्या तरी नवा कोणताही शो नाही. त्यामुळं सा रे ग म पा हा शो पुढे काही आठवडे सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र आदित्यचा या शोसाठीचा करार 3 जुलैपर्यंत होता. त्यामुळं इतर कमिटेमेंट्समुळं पुढील भागात सूत्रसंचालन करु शकणार नसल्याचं आदित्यनं सांगितलं.. त्यामुळं 9 जुलै आणि 13 जुलै प्रसारीत होणा-या शोचं सूत्रसंचालन जय भानुशाली करेल तर 10 जुलैच्या भागाचं सूत्रसंचालन अंताक्षरी फेम अनु कपूर करतील.