Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इश्कबाज' मालितकेतील नकुलसाठी कोणती गोष्ट आहे लकी चार्म?जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 17:11 IST

'इश्कबाज' मालिकेत रंगणार आहे एक लग्नसोहळा. हा लग्नसोहळा दुस-या तिस-या कोणाचा नसून तो नकुल मेहता साकारत असलेला शिवाय सिंह ...

'इश्कबाज' मालिकेत रंगणार आहे एक लग्नसोहळा. हा लग्नसोहळा दुस-या तिस-या कोणाचा नसून तो नकुल मेहता साकारत असलेला शिवाय सिंह ओबरॉयचा  लग्नसोहळा असणार आहे. एखाद्या राजकुमाराप्रमाणे वाटावा असा भव्य पंजाबी सोहळा मालिकेत पाहायला मिळणार आहे. ऑनस्क्रीन रंगणा-या संगीत सेरेमनीसाठी नकूल( शिवाय ) खास  त्याची रिअल लाईफ पत्नी जानकीने भेट दिलेले घडयाळही घालणार आहे. जानकीने हे त्यांच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला हे  घड्याळ मला भेट म्हणून दिले होते त्यामुळे ते माझ्यासाठी खूप खास आहे.मी ते रोज वापरतो.इतकेच नाही तर हे घड्याळ माझ्यासाठी लकीचार्म आहे. त्यामुळेच मालिकेत ही मी साकारत असलेली भूमिकेसाठी हे घड्याळ लकी ठरेल त्यामुळे मी हे घड्याळ घालण्याचे ठरवले असे नकुलने सांगितले. तर दुसरीकडे शिवायही त्याच्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे.वेगवेगळ्या गोष्टी रसिकांना पाहायला मिळतील. तुर्तास लग्नसोहळ्यात रंगणा-या संगीत सेरेमनीमध्ये ओबरॉय कुटूंब संगीताच्या तालावर थिरकताना दिसतील.या सोहळ्या बॉलिवडच्या हिट गाण्यांवर थिरकण्यासाठी  ओबरॉय कुटूंबाची जोरदार तयारीही सूरू आहे. त्यामुळे यांची ही मेहनत मालिकेत मनोरंजनाचे किती रंग उधळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.