नीरज गोस्वामीने सगळ्यांपासून काय लपवले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 14:33 IST
श्रावणबाळ रॉकस्टार या मालिकेत नीरज गोस्वामी ऋषी आणि आरजे आवास अशा दोन भूमिका साकारत आहे. ऋषीला त्याच्या कंपनीकडून घर ...
नीरज गोस्वामीने सगळ्यांपासून काय लपवले?
श्रावणबाळ रॉकस्टार या मालिकेत नीरज गोस्वामी ऋषी आणि आरजे आवास अशा दोन भूमिका साकारत आहे. ऋषीला त्याच्या कंपनीकडून घर मिळाले असल्याने त्याला ती नोकरी सोडायची नाहीये. तसेच रेडिओ जॉकी बनण्याची संधी खूपच कमी जणांना मिळते. त्यामुळे त्याला ती संधीदेखील सोडायची नाहीये. तो आरजे आवास आहे हे कोणाला कळू नये यासाठी त्याची मालिकेत सतत धडपड सुरू असते. त्याच्या केवळ एका मित्रालाच ही गोष्ट माहीत आहे. मालिकेत तो सगळ्यांपासून जशी ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्याच्या खऱ्या आयुष्यातही नुकतीच एक गोष्ट सगळ्यांपासून त्याने लपवली.नीरज मुंबईत अनेकवेळा बाईकवरून फिरतो. बाईक चालवायला त्याला खूपच आवडते. पण काही दिवसांपूर्वी तो घरातून निघून काहीच अंतरावर गेला असता त्याची बाईक स्लिप झाली. त्याला काही कळायच्या आतच त्याची बाईक स्लिप झाली आणि त्यात त्याला चांगलीच दुखापत झाली. त्याचा पाय खूप सुजला होता. त्याला चालायलाही त्रास होत होता. पण नीरज मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असल्याने मालिकेच्या चित्रीकरणापासून दूर राहाणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे त्याही अवस्थेत त्याने मालिकेचे चित्रीकरण केले. त्याला खरे तर चित्रीकरण करताना खूप त्रास होत होता. पण त्याने हे कोणालाच जाणवू दिले नाही. केवळ चित्रीकरणाच्या दरम्यान काही वेळ मिळाल्यास तो आराम करत असे. नीरजचा इतका मोठा अपघात होऊनही त्याने एकही दिवसाची सुट्टी घेतली नाही. यातूनच त्याच्यासाठी वर्क कम्स फर्स्ट असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.