Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंद्र-नंदिनी या मालिकेच्या सेटवर हे काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 17:19 IST

चंद्र-नंदिनी या मालिकेत लवकरच चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच आणि नंदिनी यांचे लग्न होणार आहे. या मालिकेत चंद्रगुप्तची व्यक्तिरेखा रजत टोकस ...

चंद्र-नंदिनी या मालिकेत लवकरच चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच आणि नंदिनी यांचे लग्न होणार आहे. या मालिकेत चंद्रगुप्तची व्यक्तिरेखा रजत टोकस तर नंदिनीची व्यक्तिरेखा श्वेता बासू प्रसाद साकारत आहे. या मालिकेतील हे लग्न खरेखुरे वाटावे यासाठी लग्न लावण्यासाठी खऱ्याखुऱ्या पंडितांना आमंत्रण देण्यात आले होते. या मालिकेतील लग्नाचा सोहळा हा अतिशय महत्त्वाचा आहे. या लग्नसोहळ्यानंतर मालिकेच्या कथानकाला एक कलाटणी मिळणार आहे. यामुळे या दृश्याचे चित्रीकरण अधिकाधिक चांगले व्हावे यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमसोबतच या मालिकेची निर्माती एकता कपूर प्रचंड मेहनत घेत आहे. प्रत्येक गोष्टीत ती बाराकाईने लक्ष देत आहे. हा विवाहसोहळा अतिशय भव्य वाटावा या हेतूने या खास दृश्यासाठी एक खास सेट बांधण्यात आला आहे. या केवळ एका दृश्यावर खूप सारा पैसा खर्च करण्यात आला आहे. कोणत्याही गोष्टीत कमरता पडू नये यासाठी संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे. लग्न लागताना जे मंत्रोपच्चार केले जातात ते खोटे वाटू नयेत यासाठी कोणत्याही कलाकाराला पंडितची भूमिका न देता खऱ्याखुऱ्या पंडितला सेटवर बोलावण्यात आले होते. हे मंत्र ऐकून प्रेक्षकांना ते खरेच एखादे लग्न पाहात आहेत असे वाटेल असे एकताचे मत होते. चंद्र-नंदिनीच्या लग्नाच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मालिकेच्या टीमला एकता कपूरकडे परवानगी मागावी लागत आहे. दृश्यात वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट एकताला पहिल्यांदा दाखवली जात आहे आणि त्यानंतरच या गोष्टीचा मालिकेत वापर करायचा की नाही हे एकता ठरवत आहे. हे केवळ मालिकेतील एक दृश्य असले तरी हे लग्न एखाद्या खऱ्या लग्नाप्रमाणे दिव्य दाखवले जाणार आहे.