Join us

​बादशहा गाणार ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 13:37 IST

स्टार प्लस वाहिनीवरील दिल है हिंदुस्थानी या कार्यक्रमात सध्या बादशहा परीक्षकाची भूमिका बजावत आहे. बादशहा आता याच वाहिनीवरील एका ...

स्टार प्लस वाहिनीवरील दिल है हिंदुस्थानी या कार्यक्रमात सध्या बादशहा परीक्षकाची भूमिका बजावत आहे. बादशहा आता याच वाहिनीवरील एका कार्यक्रमात झळकणार आहे. बादशहा ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचा भाग होणार आहे.बादशहा मालिकेचा भाग होणार म्हणजे तो मालिकेत अभिनय करणार असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तो ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत गाणी गाणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आता कार्तिक म्हणजेच मोहसिन खान आणि नायरा म्हणजेच शिवांगी जोशीचे लग्न पाहायला मिळणार आहे. हा लग्नसोहळा अतिशय भव्य व्हावा यासाठी मालिकेचे निर्माते राजन साही कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीयेत. या विवाहसोहळ्याचे विधी दोन-तीस दिवस मालिकेत दाखवले जाणार आहेत. यात लग्नाप्रमाणेच मेहेंदी, संगीत, हळद यांचा समावेश असणार आहे. राजस्थामधील शाही विवाह कशाप्रकारे असतात हे या मालिकेद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या लग्नसोहळ्यात प्रसिद्ध गायक बादशहादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वधू-वरांमधील प्रेमाला अधोरेखित करण्यासाठी बादशहा त्यांच्या लग्नसोहळ्यात काही गाणी गाताना दिसणार आहे. बादशहा मालिकेच्या चित्रीकरणास येणार असल्याने मालिकेची टीम प्रचंड खूश आहे. बादशहा गात असलेल्या गाण्यांवर नाचायला मिळणार याचा त्यांना प्रचंड आनंद होत आहे. याविषयी शिवांगी सांगते, "बादशहा माझा आवडता गायक आहे. आम्ही त्याच्या हम्मा-हम्मा, सॅटर्डे-सॅटर्डे, अभी तो पार्टी शुरू हुई है यांसारख्या गाण्यांवर कधी नाचतो असे मला झाले आहे. आम्ही सगळेच बादशहाच्या गाण्यावर थिरकण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत."