Join us
Daily Top 2Weekly Top 5

सध्या काय करतेय 'तारक मेहता'मधील अंजली भाभी उर्फ नेहा मेहता?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 11:14 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अंजली भाभी म्हणजेच अभिनेत्री नेहा मेहताने १२ वर्षांनंतर मालिका सोडली.

सोनी सब टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधील अंजली भाभी आठवतेय ना. आम्ही नवीन अंजली भाभीबद्दल बोलत नाही आहोत. आम्ही जुन्या अंजली मेहताबद्दल बोलत आहोत. अंजली मेहता म्हणजेच अभिनेत्री नेहा मेहताने १२ वर्षांनंतर मालिकेचा निरोप घेतला आहे. नेहा मेहताने शो सोडल्यानंतर चाहते नाराज झाले होते कारण त्यांना तारक आणि अंजलीची जोडी चाहत्यांना खूप भावत होती. मात्र नवीन अंजली म्हणजेच अभिनेत्री सुनैना फौजदारने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून आपली ओळख बनवणारी अभिनेत्री नेहा मेहताचा जन्म ९ जून, १९७८ साली गुजरातमधील भावनगरमध्ये झाला. नेहाने आपल्या करिअरची सुरूवात २००१ साली डॉलर बहू मालिकेतून केली होती. मात्र २००८ साली तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून नेहा मेहताला खूप लोकप्रियता मिळाली. आज भलेही तिने मालिका सोडली असली तरी तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये जराही फरक पडलेला नाही.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडल्यानंतर नेहा मेहता काय करते आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. याबाबत नेहा मेहताने नुकतेच एका मुलाखतीत याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, जेव्हा मला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची ऑफर झाली होती तेव्हा मी खूप कॉन्फिडंट नव्हती की मी ही भूमिका करू शकेन. मात्र मी या मालिकेत १२ वर्षे काम केले. ही मालिका सोडणे माझ्यासाठी सोपे नव्हते. ही मालिका सोडल्यानंतर मला या गोष्टीची जाणीवर झाली की मी खूप काही करू शकते आणि मी गुजराती चित्रपटांकडे वळले.

नेहा मेहता पुढे म्हणाली की, मी नुकतेच एका गुजराती चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यात मी एक महत्त्वाची भूमिका करताना दिसणार आहे. हा चित्रपट महिला सक्षमीकरणावर आधारीत आहे. शोच्या कमबॅकबद्दल विचारल्यावर ती म्हणाली की, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये कमबॅक करण्यासाठी इच्छुक आहे पण काही बदल हवे आहेत. काही गोष्टींना तिची परवानगी नाही. मात्र आता याबद्दल ती जास्त विचार करत नाही.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा