स्टार प्लसवरील लोकप्रिय कॉमेडी शो खिचडी आता नवीन वर्षामध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. ह्या शोमधील मूळ कलाकार ह्या सीझनमध्येही असणार आहेत. जयश्री पारेखच्या रूपात वंदना पाठक दिसून येणार आहेत.
या शो च्या आधीच्या सीझन्समध्ये जयश्री अगदी भारतीय गुजराती लूकमध्ये प्लेन गुजराती साडी आणि साध्या हेअरस्टाईलमध्ये दिसून आली होती. पण आता दीर्घकाळानंतर हा शो परत येताना असं ऐकिवात आहे की जयश्रीचा लूक बदलण्यात आला असून ती अगदी मॉडर्न अवतारात दिसून येईल. याबद्दल जेडी मजेठिया म्हणाले, पारंपारिक असली तरी जयश्रीची व्यक्तिरेखा पारेख परिवार आणि वास्तविक जग यांमधील दुवा आहे. ती बदलत्या काळासोबत बदलली असून आता ह्या शो सोबत परत येताना जयश्री होती तशीच आहे फक्त तिला आम्ही लूक पाश्चिमात्य दिला आहे.
खिचडी ही मालिका पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या मालिकेत जुन्या कलाकारांसोबतच काही नव्या कलाकारांची एंट्री होणार आहे. ‘खिचडी’ या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये खिचडी या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, सुप्रिया पाठक, रेणुका शहाणे आणि स्वत: जे. डी. मजेडिया प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत खिचडीच्या सुरुवातीच्याच भागांमध्ये रेणुकाची एंट्री होणार असून ती पारेख कुटुंबातील एखाद्या सदस्याचे अपहरण करते असे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. तसेच ‘पीओडब्ल्यू’ मालिकेतील समीक्षा देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दिल तो पागल है या मालिकेत झळकलेल्या बलविंदर सिंगची या मालिकेत एंट्री होणार आहे. बलविंदर आणि समीक्षा आपल्याला परमिंदर कुटुंबातील सदस्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे निर्माते आतिश कपाडिया यांचा मुलगा अगस्त्या आणि जेडी मजेठीया यांची मुलगी मिश्री या मालिकेत जॅकी आणि चक्की या भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच सुनील ग्रोव्हर देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
खिचडीमध्ये वंदना पाठक दिसणार वेस्टर्न लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 10:40 IST