Join us

वीणने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:17 IST

कुमकुम भाग्य या मालिकेत पूरबची भूमिका साकारणाऱ्या अर्जित तनेजाने या मालिकेला रामराम ठोकला. अर्जितची जागा कोण घेणार याविषयी कित्येक ...

कुमकुम भाग्य या मालिकेत पूरबची भूमिका साकारणाऱ्या अर्जित तनेजाने या मालिकेला रामराम ठोकला. अर्जितची जागा कोण घेणार याविषयी कित्येक दिवसांपासून अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. मधुबाला एक इश्क एक जुनून या मालिकेत झळकलेल्या गुंजन उतरेजाचा या भूमिकेसाठी विचार केला गेला होता. पण काही कारणास्तव गुंजन या मालिकेचा भाग होऊ शकला नाही. त्याच्यानंतर इशान सिंग मन्हास ही भूमिका साकारणार अशी चर्चा होती. इशान या मालिकेत पुरबची भूमिका साकारणार असे ठरले असताना शेवटच्या क्षणी या भूमिकेसाठी वीण राणाची निवड करण्यात आली. वीणने महाभारतामध्ये नकुलची भूमिका साकारली होती. तसेच विषकन्या...एक अनोखी प्रेम कहानी, एक हसिना थी यांसारख्या मालिकांमध्ये वीणने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.