विवेकला आला राग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 12:54 IST
विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी यांचे लग्न ८ जुलैला असून त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका छापून ...
विवेकला आला राग
विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी यांचे लग्न ८ जुलैला असून त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका छापून आली असून ती जवळच्या नातलगांना आणि मित्रमैत्रिणींना वाटण्याचे काम त्यांच्या घरातील मंडळी करत आहेत. पण हीच पत्रिका मीडियाच्या काही मंडळींच्या हाती लागल्यामुळे विवेक भडकला आहे. विवेकच्यामते लग्नाची पत्रिका ही मीडियापर्यंत कशी पोहोचली याची त्याला कल्पना नाही. काही गोष्टी या अत्यंत खासगी असतात आणि सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याचा मान राखणे गरजेचे आहे. लग्नाची पत्रिका मीडियापर्यंत पोहोचली आहे ही गोष्ट त्याला अजिबात आवडली नसल्याचे तो सांगतो. कारण या पत्रिकेत लग्नाची तारीख, वेळ, जागा तसेच आमच्या कुटुंबियातील लोकांविषयी सगळी माहिती आहे. कोणाचीही अशाप्रकारची वैयक्तिक माहिती मीडियात जाणे हे चुकीचेच असल्याचे त्याचे म्हणणे आहे.