Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालिकेत झळकण्यापूर्वी पिज्जा डिलीवरचे काम करायाचा दिव्यांका त्रिपाठीचा पती विवेक दहिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 12:59 IST

चंदेरी दुनियेतील मालिका विश्वातील अनेक लोकप्रिय टीव्ही कालाकारांकडे आज पैसा,प्रसिध्दी आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींसह ऐशोआरामात त्यांचे आयुष्य ते ...

चंदेरी दुनियेतील मालिका विश्वातील अनेक लोकप्रिय टीव्ही कालाकारांकडे आज पैसा,प्रसिध्दी आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींसह ऐशोआरामात त्यांचे आयुष्य ते जगत असतील मात्र इतके यश संपादन करण्यासाठी अनेकांनी छोटे छोटे काम करत आज यश गाठल्याचे पाहायला मिळतंय. नुकतेच एका टीव्ही अभिनेत्याने त्याचे स्ट्रगलविषयी बोलताना एका गोष्टीचा खुलासा केला.'ये है मोहब्बते' फेम दिव्यांका त्रिपाठीचा पती विवेक दहिया अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पिज्जा डिलीवरीचे काम करायाचा असे विवकने एका कार्यक्रमात सांगितले. आज सगळे एक अभिनेता म्हणून मला ओळखतात सगळ्या गाडी एक अलिशान फ्लॅट सगळ्या गोष्टी मला मिळाल्या त्या केवळ मी केलेल्या संघर्षामुळेच असे विवेक दहियाने सांगितले. अभियात काम करण्याचे स्वप्न घेवून मी मुंबईत दाखल झालो.त्यावेळी कुठून काम मिळवायचे, कोणाशी बोलायचे याविषयी काहीच माहित नव्हते. मुंबईत रहायचे म्हटले तर काम करणे गरजेचे होते. त्यावेळी एका ठिकाणी पिज्जा डिलीव्हरी बॉयसाठी व्हॅकेसी असल्याचा बोर्ड वाचला.तिथे जावून भेटला आणि दुस-या दिवशी त्यांनी मला पिज्जा डिलीवरी बॉय म्हणून नोकरीवर ठेवले. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. याच संघर्षावर मात करत आपल्याला यश गाठायचे आहे हेच मनात होते. त्यामुळे हे काम सांभाळत अभिनयक्षेत्रात काम मिळवण्यासाठी संघर्षही सुरूच होता. अखेर मेहनतीला फळ हे मिळतेच त्याचप्रमाणे हळूहळू अभियक्षेत्रात एंट्री केली आणि आज एक अभिनेता म्हणून रसिक ओळखतात या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. आज चांगला यशस्वी अभिनेता म्हणून नाव कमावल्यानंतरही मला माझे संघर्षाचे दिवस आठवताच एक वेगळीच ऊर्जा देवून जात असल्याचे विवेक दहियाने सांगितले.