शिव भानुमतीच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 10:55 IST
एफआयआर या मालिकेत कविता कौशिक आणि शिव पंडित यांनी काम केले होते. सध्या कविता डॉ. भानुमती ऑन ड्युटी या ...
शिव भानुमतीच्या भेटीला
एफआयआर या मालिकेत कविता कौशिक आणि शिव पंडित यांनी काम केले होते. सध्या कविता डॉ. भानुमती ऑन ड्युटी या मालिकेत काम करत आहे तर शिव त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सेवेन अव्हर्स टू गो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच डॉ. भानुमती ऑन ड्युटी या मालिकेच्या सेटवर गेला होता. शिवसोबत चित्रीकरण करण्याचा अनुभव खूप चांगला असल्याचे कविता सांगते. कविताच्या मते तिचे आणि शिवचे नाते हे टॉम अँड जेरीप्रमाणे आहे. तिचे आणि शिवचे खऱ्या आयुष्यात खूप चांगले ट्युनिंग असल्याने ते पडद्यावरही खूप चांगले दिसून येते असे तिचे म्हणणे आहे.