Join us
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टीचा मेकओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 09:53 IST

दिल मिल गये या पहिल्या मालिकेपासून दृष्टी धामी प्रेक्षकांना मोठ्या केसांमध्ये पाहायला मिळाली आहे. तिचे तिच्या केसांवर अतिशय प्रेम ...

दिल मिल गये या पहिल्या मालिकेपासून दृष्टी धामी प्रेक्षकांना मोठ्या केसांमध्ये पाहायला मिळाली आहे. तिचे तिच्या केसांवर अतिशय प्रेम असल्याचे ती अनेकवेळा सांगते. पण परदेस में है मेरा दिल या तिच्या नव्या मालिकेसाठी तिने तिचे केस कापले आहेत. तिने या मालिकेतील भूमिकेसाठी तिचा मेकओव्हर केला आहे. या मेकओव्हरविषयी दृष्टी सांगते, "या मालिकेतील माझी भूमिका मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. नयना ही अतिशय मॅच्युअर्ड मुलगी आहे. त्यामुळे माझा लूक हा वेगळा असावा असे मालिकेच्या निर्मात्यांना वाटत होते. त्यांनीच मी केस कापावे असे मला सुचवले. या हेअर कटनंतर एक फ्रेश लूक मला मिळालेला आहे. हा लूक मला खूपच आवडत आहे."