Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लव्ह लग्न लोचाचे विनय, राघव आणि सुमीत होणार बेघर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 17:52 IST

लव्ह लग्न लोचा या मालिकेच्या नावातच लोचा असल्याने या मालिकेत नेहमीच काही ना काही तरी लोचा झालेल्या आपल्याला पाहायला ...

लव्ह लग्न लोचा या मालिकेच्या नावातच लोचा असल्याने या मालिकेत नेहमीच काही ना काही तरी लोचा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्यामुळे या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आपलेसे केले आहे. मैत्रीचे वेगेवेगळे रंग दाखवणारी ही मालिका प्रत्येक शहरात आणि गावात आवडीने पहिली जात आहे. यातील राघव, सौम्या, अभिमान, सुमीत, विनय, काव्या, आकांशा आणि खळखळून हसणारी शाल्मली ही मित्रमंडळी आज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. आता लव्ह लग्न लोचा या मालिकेमध्ये एक मोठा लोचा होणार आहे. यातील विनय, राघव आणि सुमीत आता बेघर होणार आहेत. विनय, राघव आणि सुमीत हे गेली अनेक वर्षे माने कुटुंबियांच्या फ्लॅटमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे माने कुटुंबसुद्धा त्यांना अगदी आपल्या मुलांसारखे सांभाळतात. त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. पण हेच माने यांच्या खऱ्या मुलाला पटत नाहीये. त्यांचा मुलगा श्रीकांत अनेक वर्षे अमेरिकेत राहात होता. स्वभावाने तो अतिशय अहंकारी, तिरकस आहे. श्रीकांत ही भूमिका या मालिकेत समीर खांडेकर साकारत आहे. श्रीकांत तिरस्काराने पेटला असल्याने विनय, सुमीत आणि राघव हे कसे चुकीची आहेत हे तो मानेकाकूंना पटवून देणार आहे. त्यामुळे त्या तिघांना ते घराबाहेर काढणार आहेत. त्यामुळे या तिघांचे आता काय होणार हे तिघे कुठे जाणार तसेच श्रीकांतने या तिघांविरुद्ध रचलेला कट यशस्वी होणार का या सगळ्यांची उत्तरे पुढील काहीच भागांत प्रेक्षकांना मिळणार आहेत.