Join us  

Video: 'आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा..'; पत्नीसोबत रोमॅण्टिक झाला कुशल बद्रिके

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 4:10 PM

Kushal badrike: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुशल आणि त्याच्या पत्नीचे काही निवांत क्षण कैद करण्यात आले आहेत.

लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मन जिंकणारा कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतो. समाजात किंवा त्यांच्या खासगी आयुष्यात कोणतीही घटना घडली की कुशल त्यावर पोस्ट शेअर करत व्यक्त होत असतो.यात बऱ्याचदा तो त्याच्या पत्नीविषयी पोस्ट शेअर करतो. यावेळीदेखील त्याने एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने त्याच्या पत्नीविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे.

अलिकडेच कुशलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत दिसत असून त्या दोघांचे काही निवांत क्षण त्याने कॅमेरात कैद केले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओला त्याने दिलेलं कॅप्शन खास ठरत आहे. या कॅप्शनमध्ये त्याने वपूंच्या काही ओळी लिहिल्या आहेत.

'आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते', असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. कुशल सुकून या नावाने कायम काही कोट्स, कविता शेअर करत असतो. त्याचे हे कोट्स अनेकदा चर्चेचा विषयदेखील ठरत असतात.

टॅग्स :कुशल बद्रिकेटेलिव्हिजनसेलिब्रिटी