Join us

'वीण दोघातली ही तुटेना' उत्कंठावर्धक वळणावर, स्वानंदी आणि समरच्या नात्यात येणार तणाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:01 IST

तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांची नवीन मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatali Tutena) नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे.

तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांची नवीन मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatali Tutena) नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे. मालिकेत भावनांचा खेळ सुरु आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 

आश्रमातील समस्या हाताळताना स्वानंदीने कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी तिने थेट वकीलांची मदत घेतली. तिच्या या निर्णयाला आश्रमातील अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला आणि सर्वांनी एकत्र येऊन भविष्याचे निर्णय एकमताने घेण्याचा निर्धार व्यक्त केला. दुसरीकडे, समरच्या घरी अधिराच्या स्थळ पाहण्याचा ठरलंय. काकू समरला या कार्यक्रमासाठी वेळेत घरी पोहोचण्याची विनंती करते. समर निघालाही आहे पण रस्त्यात त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येत. सुष्मिता आणि तिच्या आईचा रस्त्यात अपघात होतो. दोघींची अवस्था चिंताजनक नसली तरी यामुळे समर घरी वेळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कुटुंबीयांचा समरवरचा रोष वाढतो.

त्याचवेळी स्वानंदीला रोहनचा फोन येतो. रोहनच्या प्रमोशनची बातमी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते आणि स्वानंदी त्याच यश साजरे करण्यासाठी घरातच एक छोटंसं सेलिब्रेशन आयोजित करते. आता समरचा संयम तुटलाय. घरातल्या घटनांवर आणि स्वतःवर होणाऱ्या दबावामुळे त्रस्त होऊन तो थेट कमिशनर साहेबांना कॉल करून स्वानंदीच्या घरातल्या विरुद्ध तक्रार दाखल करतो. या धक्कादायक निर्णयाचा परिणाम फारच गंभीर आहे. सेलिब्रेशनच्या मधेच पोलीस घरात पोहोचतात आणि स्वानंदीच्या आई, सुष्मिताला चौकशीसाठी घेऊन जातात. स्वानंदीसाठी हा कसोटीचा काळ सुरू आहे. समरला आपल्या कृतीचा पश्चाताप होईल?  हे कुटुंब पुन्हा एकत्र येईल का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मालिका पाहावी लागेल.

टॅग्स :सुबोध भावे तेजश्री प्रधान