Join us  

मी कधीच मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही...’ उर्फी जावेदनं केला खुलासा, सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 10:19 AM

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद सतत (Urfi Javed) चर्चेत असते ती तिच्या कपड्यांमुळे. अनेकदा कपड्यांमुळे ती ट्रोलही होते. आता उर्फीने खुलासा केला आहे तो तिच्या लग्नाबद्दल.

बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद सतत (Urfi Javed) चर्चेत असते ती तिच्या कपड्यांमुळे. अनेकदा कपड्यांमुळे ती ट्रोलही होते. पण बिनधास्त, बेफिक्रे उर्फी या ट्रोलिंग पर्वा करणा-यांपैकी नाहीच मुळी. आता उर्फीने खुलासा केला आहे तो तिच्या लग्नाबद्दल. होय, मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही, असं तिने म्हटलं आहे. विशेष म्हणजे, यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत उर्फी बोलली. यावेळी ती म्हणाली, ‘मी मुस्लिम मुलगी आहे. पण माझ्या प्रत्येक पोस्टवर घाणेरड्या कमेंट्स करणारे सर्वाधिक मुस्लिमच असतात. मी इस्लामची प्रतिमा मलिन करतेय, असं त्यांना वाटतं. ते माझा तिरस्कार करतात. कारण आपल्या महिलांनी एका विशिष्ट पद्धतीनेच वागावं, असं मुस्लिम पुरूषांना वाटतं. ते सर्व महिलांना नियंत्रित करू इच्छितात. हेच कारण आहे की मी इस्लाम मानत नाही. मी त्यांच्या म्हणण्यानुसार वागत नाही, म्हणून ते मला ट्रोल करतात, माझा राग करतात. त्यामुळे मी कधीही मुस्लिम पुरूषाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम वा अन्य कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे मी कोणाच्याही प्रेमात पडू शकते. मला आवडेल, त्या व्यक्तिशी मी लग्न करेल.’

कोणावरही धर्म लादला जाऊ नये. सर्वांना आपल्या मर्जीने धर्म निवडण्याचा अधिकार आहे. माझे वडील कट्टर रूढी-परंपरा मानणारे होते. मी 17 वर्षांची असताना त्यांनी मला व माझ्या भावंडांना, माझ्या आईला सोडून दिलं. माझी आई सुद्धा धार्मिक आहे. पण तिने माझ्यावर धर्म थोपला नाही. माझी भावंड इस्लाम फॉलो करतात. पण त्यांनी मला यासाठी कधी बळजबरी केली नाही. तुम्ही तुमच्या पत्नी व मुलांवर धर्म थोपवू शकत नाही. हे हृदयातून यायला हवं. असं नसेल तर ना तुम्ही आनंदी राहाल, ना अल्लाह, असेही ती म्हणाली.

 उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत आहे.

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनसेलिब्रिटी