Join us
Daily Top 2Weekly Top 5

​गोठमधील समीर परांजपेला फॅनकडून मिळाले हे अनोखे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 14:05 IST

सेलिब्रिटी आणि फॅन यांच्यातले नाते शब्दातीत असते. फॅन आपल्या आवडत्या सेलिब्रेटीवरचे प्रेम छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्त करत असतो. स्टार ...

सेलिब्रिटी आणि फॅन यांच्यातले नाते शब्दातीत असते. फॅन आपल्या आवडत्या सेलिब्रेटीवरचे प्रेम छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्त करत असतो. स्टार प्रवाहची गोठ ही मालिका गेल्या काही दिवसांत चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील राधा, बयोआजी, विलास या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. या मालिकेतील रूपल नंद, नीलकांती पाटेकर, समीर परांजपे  या कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. अभिनेता समीर परांजपेला तर या मालिकेमुळे खूपच लोकप्रियता मिळाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच त्याचे फॅन बनले आहेत. नुकतेच त्याच्या फॅनकडून त्याला खूप चांगले गिफ्ट मिळाले आहे. त्याला त्याच्या फॅन्सने चक्क आलेपाकची गोळी भेट म्हणून दिली आहे. या हटके भेटीने समीरही प्रचंड खूश झाला. इतकेच नाही तर त्याने या आलेपाकाच्या गोळीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला. ३० ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत असलेल्या विठूमाऊली या मालिकेनिमित्त नुकतेच रत्नागिरीमध्ये विठूभक्तीचा प्रवाह ही कीर्तनाची मैफल स्टार प्रवाहतर्फे आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी समीर रत्नागिरीला गेला होता. तिथे त्याने फॅन्ससोबत संवाद साधला, खूप साऱ्या गप्पा मारल्या. तसेच एक अभंगही गायला. या मैफलीनंतर त्याला त्याच्या एका  चाहत्याकडून भेट देखील मिळाली. त्याबद्दल समीर सांगतो, 'माझा घसा बरा नसतानाही फॅन्सच्या आग्रहाखातर मी अभंग गायला. कार्यक्रम संपल्यावर मी माझ्या गाडीत जाऊन बसलो तर गाडीच्या काचेवर टकटक झाली, मी काच खाली केली तर एक गृहस्थ त्यांच्या कुटुंबासह आले होते. त्या सगळ्यांनी 'गोठ' मधील तुमचे काम आम्हाला आवडते असे मला सांगितले आणि जाताना हात हातात घेऊन आलेपाकाच्या गोळ्या माझ्या हातात दिल्या. मी चमकून वर पाहिले, तर ते मला म्हणाले, 'घसा बरा नाहीये ना तुमचा, घ्या या गोळ्या बरं वाटेल.' त्या नंतर जे वाटलं, ते शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. असे प्रेक्षक भेटले की शूटिंगची धावपळ, प्रवासाचा ताण सगळे काही क्षणात निघून जाते.' Also Read : नीलकांती पाटेकरच्या घरी पोहोचला तीन वर्षांचा छोटा फॅन