Join us
Daily Top 2Weekly Top 5

मॅडम,आम्हाला पण टीप्स द्या ना...! स्मृती इराणींचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 14:12 IST

होय, केंद्रीय मंत्री व अभिनेत्री Smriti Irani यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि तो पाहून चाहते अवाक् झाले आहेत.

टीव्हीवर एकेकाळी अफाट गाजलेली ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत तुलसी विरानीची भूमिका साकारणा-या स्मृती इराणी (Smriti Irani ) यांचा आत्ताचा अगदी ताजा फोटो पाहाल तर थक्क व्हाल. होय, केंद्रीय मंत्री व अभिनेत्री स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि तो पाहून चाहते अवाक् झाले आहेत.या फोटोत स्मृती इराणी फुलांनी लदबदलेल्या एका झाडाच्या फांदीवरच्या फुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘जो पहुँच के पार है, वहीं पर बहार है...,’ अशा सुंदर कॅप्शनसोबत त्यांनी हा फोटो शेअर केलाय. पण या फोटोपेक्षा फोटोतील स्मृती इराणींचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोक थक्क झाले आहेत. (Smriti Irani's weight loss transformation )

फोटोत स्मृती इराणींचं वजन बरंच कमी झालेलं दिसतंय. साहजिकच या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मॅडम आप बहोत ज्यादा फिट लग रहे हो. कुछ उपाय वेट लॉस के लिए?’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. फुलं- झाडं तर ठीक आहेत. पण तुमच्या घटलेलं वजनानं लक्ष वेधून घेतलंय, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. फिट दिसताय, फारच छान, अशा अनेक कमेंटही नेटक-यांनी केल्या आहेत. ‘मॅम, तुमचा फोटो पाहून जुन्या स्मृती इराणी परत आल्याचं वाटतंय,’अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.स्मृती इराणी आताश: राजकारण रमल्या आहेत. पण कधीकाळी मनोरंजन विश्वात त्यांचा दबदबा होता. स्मृती इराणी यांनी वयाच्या 21 व्या वर्षी फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि यानंतर स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.  एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. त्याआधी  मिका सिंगच्या ‘बोलियां’ या म्युझिक व्हिडीओमध्ये त्या झळकल्या होत्या.  2003 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

टॅग्स :स्मृती इराणी