Join us

​दिव्यांका करणार दोन दोन लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 16:48 IST

दिव्यांका त्रिपाठी दोनदा लग्न करणार आहे.दोन वेळा ती रेशीमगाठीत अडकणार आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मात्र चक्रावून जाऊ ...

दिव्यांका त्रिपाठी दोनदा लग्न करणार आहे.दोन वेळा ती रेशीमगाठीत अडकणार आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मात्र चक्रावून जाऊ नका. कारण रियल लाइफमध्ये लग्न बंधनात अडकल्यानंतर दिव्यांकाचं रिल लाइफमध्येही शुभमंगल होणार आहे.. 'ये है मोहब्बते' या मालिकेत सात वर्षांच्या लीपनंतर रमण आणि इशिता वेगवेगळे राहतायत. मात्र आगामी भागात दोघांचं पुन्हा एकदा मिलन होणार आहे. रुहीच्या अपहरणानंतर दोघंही वेगवेगळे झाले होते आणि आता रुहीच पुन्हा एकदा या दोघांना एकत्र आणणार आहे.