Join us

Video: राघवच्या घरी होणार का रमाचा अनपेक्षित गृहप्रवेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 18:42 IST

Rama raghav: नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रमा आपलं सामान घेऊन राघवच्या घरी येताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर रमा राघव ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली असून यातील रमा आणि राघव ही जोडी प्रेक्षकांना विशेष भावली आहे. या मालिकेतील रमाने तिच्या खट्याळ स्वभावामुळे प्रेक्षकांना आपलंसं केलं. तर, राघवने त्याच्या संयमी, समजूतदारपणामुळे नेटकऱ्यांचं मन जिंकलं. विशेष म्हणजे या दोघांच्या प्रेमाची तिखटगोड गोष्ट ही हळूहळू बहरू लागली आहे. मात्र, यामध्येच आता मालिकेत एक रंजक वळण येणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रमा आपलं सामान घेऊन राघवच्या घरी येताना दिसत आहे. रमावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी रमाने राघवच्या घरी रहावं अशी तिच्या वडिलांची इच्छा असते. परंतु, राघवच्या घरातल्यांना रमा फारशी आवड नाही. पण, यावेळी तिने त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवलेला नाही. इतकंच नाही तर राघवच्या घरी जाऊन ती त्याच्या घरातल्यांना पुन्हा एकदा त्रास देण्याच्या तयारीत असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे या मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, रमाचा हा अनपेक्षित गृहप्रवेश राघवच्या घरचे कसं एक्सेप्ट करतील? रमाच्या येण्याने राघव आणि तिच्या नात्याला कुठलं वेगळं वळण मिळेल?  हे सारं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राघवच्या घरातील रमाचा गृहप्रवेश हा विशेष भाग येत्या रविवारी रंगणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी