Join us  

'देवमाणूस'चा सोशल मीडियाला रामराम; किरण गायकवाडची इन्स्टावरुन एक्झिट?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:46 PM

Kiran gaikwad: सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या किरणने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद ठेवणार अशी घोषणा केली आहे.

'लागिरं झालं जी' (lagir zal ji) या मालिकेत भैय्यासाहेब ही भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे किरण गायकवाड (kiran gaikwad). 'देवमाणूस' (devmanus) या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळखल मिळाली. उत्तम अभिनयशैली आणि हटके स्टाइल यामुळे किरण सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. यात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो विविध पोस्टही शेअर करत असतो. अनेकदा किरणच्या पोस्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतात. यामध्येच सध्या त्याची एक नवी पोस्ट चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या किरणने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद ठेवणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. किरणने खरंच इन्स्टाग्राम सोडण्याचा निर्णय घेतला का?असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

''काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद,#भेटू लवकरच'', असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. परंतु, या पोस्टमध्येही एक ट्विस्ट आहे. भेटू लवकरच हा हॅशटॅग त्याने वापरल्यामुळे तो त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशन करत असल्याची शक्यताही नेटकऱ्यांनी वर्तवली आहे. तसंच काही वैयक्तिक कारणदेखील असल्यामुळे त्याने इन्स्टावर पोस्ट टाकणं बंद केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या पोस्टच्या मागचा खरा अर्थ किरणच चाहत्यांना देऊ शकतो.

दरम्यान, किरणने खरोखर इन्स्टाग्राम सोडलं नसून केवळ त्या आशयाची पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या पोस्टमधून नक्कीच काही तरी मोठा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. किरण गायकवाडने 2017 साली ‘लागिर झालं जी’ या मालिकेत भैयासाहेबची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2020 मध्ये देवमाणूस मालिकेत अजितकुमार देव या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या समोर आला.   

टॅग्स :किरण गायकवाड'देवमाणूस २' मालिकासेलिब्रिटीटेलिव्हिजन