Join us

वटपौर्णिमेच्या दिवशीच होणार अर्जुनला अटक; 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये येणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 15:45 IST

एकीकडे आप्पी अर्जुनसाठी वटसावित्रीचा उपवास करते, वडाची पूजा करते आणि दुसऱ्या क्षणी ती अर्जुनला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करते.

छोट्या पडद्यावरील 'आप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत सध्या अनेक रंगतदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अपर्णा माने कलेक्टर झाल्यापासून तिने जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच आता ती अर्जुनलादेखील कायद्याचा दणका देणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच आप्पी अर्जुनला बेड्या ठोकणार आहे. एकीकडे आप्पी अर्जुनसाठी वटसावित्रीचा उपवास करते, वडाची पूजा करते आणि दुसऱ्या क्षणी ती अर्जुनला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करते. त्यामुळे या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

दरम्यान, जूनच्या पहिल्याच आठवड्यात अर्जुनच्या अटकेचा भाग दाखवला जाणार आहे. त्यामुळे अपर्णा तिचं कर्तव्य पार पाडण्यासाठी कुठेही मागचा पुढचा विचार करणार नाही हे दिसून येतं. मात्र, अप्पीच्या या निर्णयामुळे तिच्या आणि अर्जुनच्या नात्यावर कोणता परिणाम होईल? अर्जुन अप्पीला काय उत्तर देणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी