Join us  

मंदिरात शॉर्ट घालून पोहचली टीव्हीवरील संस्कारी सून, नेटकरी संतापले, 'असे कपडे घालून देवळात कोण जातं'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 4:07 PM

अंकिताचा एक व्हिडीओ समोर आला असून  नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

अभिनेत्री अंकिता लोंखडे ही छोट्या पडद्यावरील अतिशय साधी सरळ सून म्हणून सर्वांच्याचं परिचयाची आहे. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास केलेल्या अंकिताला आजही चाहते टीव्हीची लाडकी 'संस्कारी सून' मानतात. 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहचलेली अंकिता प्रेक्षकांच्या मनावर राज्य  करते. पण, यातच अंकिताचा एक व्हिडीओ समोर आला असून  नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. ज्यामध्ये ती शॉर्ट ड्रेसमध्ये असून तिच्या हाताला फ्रॅक्चर असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे  'मंदिरातून दर्शन घेऊन आलेय, शूट करु नका' असं पापराझींना म्हणताना पाहायला मिळतेय. पण, यावर नेटकऱ्यांनी अंकिताला खरेखोटे ऐकवलं आहे.  शॉट्स घालून मंदिरात कशी जाऊ शकते, अशा कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओवर केल्या आहेत. तर काहींनी तिला खूप ओव्हरॅक्ट करते म्हटलं. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अंकिता ही अभिनेता रणदीप हुड्डासोबत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात झळकली. या सिनेमात तिनं वीर सावकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली होती. यासोबतच अंकिता लोखंडेच्या हातात सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे.  ती लाफ्टर शेफ या नवीन शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाटेलिव्हिजन