Join us

या टीव्ही कलाकारांनी बालमित्र-मैत्रिणीला बनवले आयुष्याचा जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 13:11 IST

कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. ते काय करतात, त्यांच्या जीवनाचा जोडीदार कोण हे जाणून घेण्याची रसिकांना ...

कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. ते काय करतात, त्यांच्या जीवनाचा जोडीदार कोण हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. छोट्या पडद्यावरील कलाकार असो किंवा मग रुपेरी पडद्यावरील प्रत्येक कलाकाराविषयी जाणून घेण्याबाबत रसिक आतुर असतात. विशेषतः कलाकारांच्या लाईफ पार्टनरविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्कंठा असते.छोट्या पडद्यावर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या बालमित्र किंवा मैत्रिणींना आपल्या आयुष्याचा जोडीदार बनवलं आहे. कोण आहेत असे कलाकार जाणून घेऊया.(Alsor Read:रुपेरी पडद्यावर हे कलाकार ठरले फ्लॉप,मग छोट्या पडद्याचा घेतला आधार) मनीष पॉल आणि संयुक्ताछोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध आणि चर्चित चेहरा म्हणजे मनीष पॉल. हजरजबाबी आणि तितकंच खट्याळ तसंच खोडकळ सूत्रसंचालन यामुळे मनीष पॉल कमी काळात रसिकांचा लाडका बनला. अनेक मालिकांमध्ये अभिनय आणि विविध शोजचे सूत्रसंचालन केलेल्या मनीषनं 2007 साली लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानं आपली बालमैत्रीण आणि वर्गमैत्रीण संयुक्तासह लग्न केलं. दोघांचं शालेय शिक्षण एकत्रच झाले. शालेय शिक्षणानंतर मनीषने संयुक्ताला प्रपोज केलं होतं. तेव्हापासून दोघांचं घट्ट निर्माण झालं होतं. या नात्याला पती-पत्नीचा दर्जा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.बरुन सोबती आणि पश्मिना नंदा'इस प्यार को क्या नाम दूँ' या मालिकेतील अभिनेता म्हणजे बरुन सोबती. विविध मालिका आपल्या अभिनयाने गाजवणारा बरुन आपली मैत्रीण पश्मिना नंदासह रेशीमगाठीत अडकला. बरुन आणि पश्मिना दोघंही कॉलेजमध्ये एकत्र शिकायचे. तेव्हापासून असलेल्या आपल्या मैत्रीला लग्न करुन या दोघांनी त्या नात्याला नवं नाव दिलं. श्रद्धा, दिल मिल गये, बात हमारी पक्की है या मालिकेतही बरुननं भूमिका साकारल्यात.चंदन प्रभाकर आणि नंदिनीकॉमेडीयन चंदन प्रभाकरनंही त्याच्या बालमैत्रीणीसह लग्न केलं आहे. 2015 साली चंदन आपली बालमैत्रीण नंदिनीसह रेशीमगाठीत अडकला. लहानपणापासूनच चंदन आणि नंदिनी दोघेही खूप चांगले मित्र होते. कॉमेडीयन म्हणून चंदन प्रभाकरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यानं नंदिनीसह लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय त्याने घेतला.किंशुक महाजन आणि दिव्या'सपना बाबुल काः बिदाई' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किंशुक महाजन यानं त्याची बालमैत्रीण दिव्यासह 2011 साली लग्न केलं. किंशुक आणि दिव्या लहानपणापासून एकत्र होते. दोघंही एकत्रच वाढले आणि शिकले. इकॉनॉमिक्सचे धडे त्यांनी एकत्रच घेतले. शिक्षण घेत असतानाच एकमेकांच्या नोट्स ते घ्यायचे. त्याचदरम्यान दोघांमध्ये प्रेमाचे संबंध जुळले. किंशुकने काजल, ये रिश्ता क्या कहेलाता है, अफसर बिटियाँ, तुम ऐसे ही रहेना यासह विविध मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.रोहित खुराणा आणि नेहाउतरन मालिका फेम अभिनेता रोहित खुराणा यानंही आपल्या मैत्रिणीसह लग्न केलं आहे. टीव्ही इंडस्ट्रीत येण्याआधी रोहित खुराणा आपली मैत्रीण नेहासह रेशीमगाठीत अडकला. रोहितनं मिले जब हम तुम, दिल की नजर से खुबसूरत, लाजवंती, सुहानी सी एक लडकी अशा विविध मालिकांमध्ये त्यानं भूमिका साकारल्या.ऋचा हसबनीस आणि राहुल जगदाळेछोट्या पडद्यावरील 'साथ निभाना साथियाँ' मालिकेत राशीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री ऋचा हसबनीस हिने रसिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. 2015 साली ऋचानं आपला बालमित्र राहुल जगदाळे याच्यासह लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. शालेय जीवनापासून दोघं मित्र होते. आता हे बालमित्र पती-पत्नी बनले आहेत. कुटुंब आणि प्रेमासाठी ऋचानं आपल्या करियरला सोडण्याचाही निर्णय घेतला. साथ निभाना साथियाँ या मालिकेसोबतच कॉमेडी सर्कस के तानसेनमध्येही ऋचा झळकली होती.