Join us

या टीव्ही अभिनेत्रीने केला असा मेकअप की, लोकांना करावी लागली असे न करण्याची विनंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 19:37 IST

या टीव्ही अभिनेत्रीचा मेकअप सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर असा मेकअप करू नये अशा प्रकारची लोकांना विनंती करण्यात येत आहे.

‘जमाई राजा’ या मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री निया शर्मा सध्या एका भलत्याच कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. होय, नियाचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तिचा विचित्र मेकअप चर्चेचा विषय ठरत आहे. भडक मेकअपवर तिने लावलेल्या लिपस्टिकचा शेड खूपच विचित्र दिसत आहे. या व्हिडीओमध्ये निया स्माइल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तिच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांना विनंती करण्यात आली की, त्यांनी अशा प्रकारच्या लिपस्टिकचा वापर करू नये. दरम्यान, नियाने हा मेकअप स्टंट तिच्या स्टायलिस्टकडून करून घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच नियाचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये ती पंजाबी गाण्यावर भररस्त्यात ठुमके लावताना दिसत होती. दरम्यान, निया शर्मा सध्या ‘ट्विस्टेड-२’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहे. या मालिकेशी संबंधित जबरदस्त फोटोज् ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करीत आहे. काही दिवसांपूर्वीच नियाने दुसºया सीजनविषयी बोलताना म्हटले होते की, ‘ट्विस्टेड-१’ माझ्यासाठी गेम चेंजर ठरला. कारण टीव्हीवरून वेबवर हे माझे पहिले पाऊल होते. मी कधीही स्वत:ला ग्लॅमरस समजले नाही. तसेच कधीही हा विचार केला नाही की, मी आलिया मुखर्जीसारखी भूमिका साकारणार. आता ‘ट्विस्टेड-२’सोबत मी अधिक आत्मविश्वास, ग्लॅमरस आणि आलिया लूकमध्ये अधिक प्रयोग करण्यास उत्सुक आहे.  निया शर्माने आपल्या करिअरची सुरुवात ‘काली’ या टीव्ही शोमधून केली होती. तिला ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून खºया अर्थाने लोकप्रियता मिळाली. याव्यतिरिक्त ती ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमच्या सीजन-८ मध्ये झळकली होती. दिल्लीमध्ये जन्मलेल्या नियाने मास कम्युनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. तिचे खरे नाव नेहा शर्मा आहे. ‘खतरों के खिलाडी’मध्ये तिने जबरदस्त स्टंट करून लोकप्रियता मिळविली होती.