Join us  

लग्नानंतर काही दिवसातच दलजीत कौर रुग्णालयात, नवऱ्याची तक्रार करत म्हणाली, "त्याला फक्त..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 4:48 PM

दलजीतने नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) काही दिवसांपासून तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. बिग बॉस स्पर्धक शालीन भनोतसह घटस्फोट झाल्यानंतर दलजीतने उद्योगपती निखिल पटेलसोबत (Nikhil Patel) दुसरं लग्न केलं. त्यांचे अनेक रोमँटिक फोटो व्हायरल झाले. दोघांच्या हनिमूनचीही बरीच चर्चा झाली. पण असे काय झाले की दलजितला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले?

दलजीतने रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर करत नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. ती म्हणाली, "माझ्या पायाच्या अंगठ्याला इन्फेक्शन झाले आहे. यामुळे अंगठा पूर्ण पिवळा पडला आहे. तर नख सुद्धा सैल पडलं आहे. मला खूपच वेदना होत आहेत. आता या इन्फेक्शनवर काय इलाज आहे तुम्हीच सांगा" असं म्हणत तिने आपले चाहते आणि फॉलोअर्सकडून सल्ला मागितला आहे.

दलजीतने चाहत्यांना विचारले, "जर कोणाला याबाबत काही माहिती असेल किंवा हे ठिक करण्यासाठी कोणी माझी मदत करु शकत असेल तर अवश्य सांगा." दलजीतने आणखी एक व्हिडिओ शेअर करत पतीची गंमतीत तक्रार केली आहे. निखिल रुग्णालयात माझ्या तब्येतीपेक्षा स्वत:च्या हेअरस्टाईल आणि लुकच्या काळजीत होते. दरम्यान दलजीतचा व्हिडिओ पाहून चाहते काळजीत पडले आहेत. तसं बघायला गेलं तर इन्फेक्शन गंभीर नाही. दलजीतच्या तिच्या पतीसोबत वेळ घालवत आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारहॉस्पिटलपती- जोडीदार