टीव्ही अभिनेत्री चारु असोपा ऑनस्क्रीन भावासोबतच थाटणार संसार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 16:10 IST
ब-याचदा मालिकेत एकत्र काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे अनेक किस्से आहेत. आज पर्यत अनेक कलाकरांच्या जोड्या या ...
टीव्ही अभिनेत्री चारु असोपा ऑनस्क्रीन भावासोबतच थाटणार संसार!
ब-याचदा मालिकेत एकत्र काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे अनेक किस्से आहेत. आज पर्यत अनेक कलाकरांच्या जोड्या या मालिकांच्याच सेटवर जास्त प्रमाणात झाल्याची आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत.मालिकेच्या सेटवरच कामानिमित्त भेटीगाठी होतात.त्यातून मैत्री होते आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होणे असे काही प्रेमाचे जणू समीकरणच बनले आहे. अगदी याचप्रमाणे आणखी एक टीव्ही कपलने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.'मेरे अंगने मे' या मालिकेत भाऊ बहिणीची भूमिका साकारणारे चारु असोपा आणि नीरज मालवीय ख-या आयुष्यात मात्र पती पत्नी बनणार आहेत. होय, नीरज आणि असोपा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून कोणालाही त्यांच्यामध्ये असलेल्या नात्याची खबर नव्हती.लग्न ठरल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना त्यांच्या प्रेमाची कबुली दिली.दोघांचाही थाटात साखरपुडाही झाला असून लग्नाची तारिख ठरलेली नसली तरीही पुढच्या वर्षी 2018मध्ये लग्न करणार असल्याचे नीरजने सांगितले आहे.मालिकेच्या सेटवर चारु-नीरज दोघांची भेट झाली होती असे अनेकांना वाटत असले तरीही, त्यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. पण प्रेम काही सांगून होत नसते अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले हे कळलेच नाही.आम्ही दोघेही एकमेकांना खूप समजून घेतो त्यामुळे आम्हाला चांगले लाईफ पार्टनर बनु शकतो असे वाटले आणि जुळून आलं असं चारूने सांगितले तर, नीरजने सांगितले की, एकमेकांना अगोदरपासून ओळखत होतो पण त्यावेळी आमच्यात फक्त फ्रेंडशीप होती. ते म्हणतात ना की सर्व काही वेळ आल्यावरच होते त्याप्रमाणे शो सुरु झाल्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.आता सध्या लग्नाला थोडा अवकाश असला तरीही लग्नाची तयारीला आत्तापासूनच तयारीला सुरूवात केली असल्याचे चारूने सांगितले. तसेच मालिकेत शूटिंगवेळी दोघेही भाऊ-बहिण दाखवले आहेत. तर ही भूमिका साकाताना अवघडल्यासारखं वाटत नाही कारण,दोघांचेही बरेचसे सीन हे वगेवेगळे आहेत.सीन एकत्र नसल्यामुळे मला अवघडल्यासारखे वाटत नसल्याचे नीरज सांगतो.चारूला मात्र मालिकेत नीरजला अमित भैय्या म्हणून बोलवावे लागते त्यामुळे बॉयफ्रेंडला भाऊ बोलवताना थोडं वेगळं वाटत असल्याचे चारूने सांगितले.