Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप झाला हैवान, टीव्ही अभिनेत्रीच्या पतीने १५ महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:12 IST

मालाडमध्ये राहणाऱ्या अभिनेत्री चंद्रिका साहाने सर्व घटना पोलिसांना सांगितली.

मुंबई - अनेकदा कलाकारांच्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक किस्से ऐकायला मिळतात. जे सिनेमा, टिव्ही मालिका यात दाखवणाऱ्या घटनांपेक्षाही भयंकर असतात. अशीच एक घटना एका टीव्ही अभिनेत्रीच्या १५ महिन्याच्या चिमुकल्यासोबत घडली आहे. हा भयंकर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक व्यक्ती चिमुकल्याला बेडरूममध्ये जमीन आपटताना दिसतोय हा व्यक्ती टीव्ही अभिनेत्रीचा पती आहे. अभिनेत्रीने या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 

अदालत, सीआयडी, सावधान इंडिया, क्राइम अलर्टसारख्या मालिकांमध्ये नजरेस आलेली अभिनेत्री चंद्रिका साहा हिचा पती अमन मिश्राने त्याच्या १५ महिन्याच्या चिमुकल्याला बेडरूमध्ये जमीनवर आपटले. या घटनेबाबत अभिनेत्रीने बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जेव्हा चंद्रिकाने घरात जखमी अवस्थेत पडलेल्या बाळाला पाहिले तेव्हा त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज तिने तपासले आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजसह ती पोलीस ठाण्यात दाखल झाली. 

बाळाच्या जन्माने पती होता नाराज मालाडमध्ये राहणाऱ्या अभिनेत्री चंद्रिका साहाने सर्व घटना पोलिसांना सांगितली. माहितीनुसार, अमन मिश्रा हा मुलाच्या जन्मापासून नाराज होता. शुक्रवारी मुलगा बेडरूममध्ये खूप रडत होता. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या. मुलाच्या रुमचा सीसीटीव्ही पाहिला असता पती अमन मिश्रा मुलाला जमिनीवर आपटताना दिसत होता. 

गर्भपात करावा यासाठी पतीचा होता दबावअभिनेत्रीने पोलीस ठाण्यात सांगितले की, जेव्हा मी २०२० मध्ये अमनला भेटले होते तेव्हा त्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आमच्यात अफेअर सुरू झाले आणि मी गर्भवती राहिले. मी अबॉर्शन करावे असं त्याची इच्छा होती. पण डॉक्टरांनी असं न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गर्भधारणेवरून आमच्यात प्रचंड वाद झाला. अखेर या वादातच दोघांनी लग्न केले. आता मुलगा १५ महिन्याचा झाला आहे. शुक्रवारी मी घरी किचनमध्ये होती तेव्हा मुलाच्या रडण्याचा आवाज आला. मी पतीला त्याच्याकडे पाहण्यास सांगितले. तेव्हा तो बाळाला घेऊन बेडरूममध्ये गेला. काही क्षणातच तिथूनही जोरात आवाज आला. मी धावत तिथे गेली तेव्हा मुलगा जमिनीवर पडला होता. 

सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा धक्का बसलामुलाला तात्काळ मी हॉस्पिटलला घेऊन गेली, त्यानंतर शनिवारी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा मला विश्वासच बसला नाही. पतीने मुलाला जमिनीवर आपटले होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज घेऊन अभिनेत्रीने पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली.  

टॅग्स :टेलिव्हिजन