Join us

"त्याने मला प्रोड्युसरला एकट्यात भेटायला सांगितलं...", टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:44 IST

अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे. एका निर्मात्याकडून अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. 

सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत. केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांसोबतही कास्टिंग काऊचच्या घटना घडलेल्या आहेत. एका टीव्ही अभिनेत्रीलाही इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला. अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे. एका निर्मात्याकडून अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. 

हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री आशी सिंहने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचचा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, "मी सुरुवातीला ऑडिशनसाठी जायचे. मला आठवतंय माझ्यासोबत हे २-३ वेळा झालं आहे. मला भूमिकेची ऑफर मिळायची पण त्याबदल्यात त्यांना माझ्याकडून काहीतरी हवं असायचं. कोणीतरी होतं ज्याला वाटत होतं की मी घरी बसावं आणि त्याच्या प्रोजेक्टची वाट बघावी. त्याला माझ्यात इन्व्हेसमेंट करायची होती. पण, हे चुकीच्या दिशेने चाललंय हे मला समजत होतं". 

"एकाने मला पाच मुलींमधून फायनल सिलेक्ट केलं. तो मला म्हणाला की प्रोड्युसरला एकट्यात भेट. मी माझ्या आईसोबत तिथे गेले होते. मला काही झालं नाही पण ते लोक मला योग्य वाटले नाहीत. ते लोक काम करतात की नाही हेही मला माहित नव्हतं", असंही तिने पुढे सांगितलं. 

टॅग्स :टिव्ही कलाकार