दरम्यान, कृतिका कामराने ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करताना म्हटले की, ‘किती बोरिंग एपिसोड आहे. मला असे वाटते की, आम्ही फॅमिली अॅँगलने हा शो बघून कंटाळलो आहोत. आता याच्यामध्ये काहीही मजा उरली नाही. नॉमिनेशन टास्कदेखील विचित्र पद्धतीने केले जात आहेत. त्याचबरोबर खूपच कमजोर कॉमेडी असल्याने हा शो आता प्रेक्षकांचा संयम बघत आहे.’
}}}} ">I swear if anybody sings “yeh big boss ka ghar hai” to me, I’m going to punch them in the face. Phew.. I’m done with that.}}}} ">— Kritika Kamra (@Kritika_Kamra) December 26, 2017
कृतिका कामराचा राग एवढ्यावरच थांबला नाही, तर तिने पुन्हा एक ट्विट करून लिहिले की, ‘शपथ घेऊन सांगते जर कोणी माझ्यासमोर बिग बॉस का घर है हे गाणे गायिले तर मी त्याचे तोंड फोडून टाकणार. कारण मी आता या शोला कंटाळली आहे.’ कृतिकाचा हा संताप बघून तिचे चाहतेही समर्थन करताना दिसत आहे. वास्तविक हा शो खरोखरच एका बोअरिंग वळणावर येऊन थांबला असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.