फैजलने झलक दिखला जा, खतरों के खिलाडी यांसारख्या अनेक रिअॅलिटी शो मध्ये काम केले आहे. त्याने आज चांगलेच यश मिळवले आहे. पण इथपर्यंत पोहोचणे हे त्याच्यासाठी शक्य नव्हते. त्याची आर्थिक परिस्थिती ही बेताची होती. त्याचे वडील दिवसभर रिक्षा चालवून घर भागवत होते. रिक्षा चालवल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास देखील होत असे. पण घर चालवण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. फैजलला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर फैजलने घराचा भार आपल्या खांद्यावर उचलला आणि वडिलांना आराम दिला. तो वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून घर चालवत आहे. आज त्याने चांगलाच पैसा मिळवला आहे. त्याने मुंबईतील एका खूप चांगल्या ठिकाणी वन बीएचके फ्लॅट घेतला आहे. तसेच त्याच्याकडे आज गाडी, बाईक देखील आहे. केवळ २० व्या वर्षी त्याने आज या सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्याचे वडील आज एका ह्युमन राइट्स ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांची ऑटो ही त्यांच्यासाठी खूप खास असल्याने त्यांनी आजही ती विकलेली नाही. त्या ऑटोमधून ते अनेकवेळा फैजलला घेऊन जातात.
Also Read : हा अभिनेता दारुच्या गेला होता अधीन... रिहॅबिटेशन सेंटरमध्ये करावे लागले होते दाखल