Join us

कसले भारी दिसतायत दोघं, राणादा आणि पाठक बाईंचा हा रॉयल अंदाज तुम्ही पाहिला का? पाहून व्हाल आवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 15:11 IST

राणादा म्हणजे हार्दिक जोशी आणि अंजली बाई म्हणजे अक्षया देवधर दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघेही निरनिराळ्या अंदाजात फोटोशूट करत चाहत्यांची वाहवा मिळवत आहेत.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेले राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर याच मालिकेमुळे दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेतील त्यांचा अंदाज ही रसिकांच्या पसंतीस पत्र ठरला होता.अंजली बाई आणि राणादा दोघांच्या ऑनस्क्रीन जोडीने रसिकांची भरपूर पसंती मिळवली होती. 

राणादा आणि पाठकबाई ही जोडी अल्पावधीतच रसिकांची आवडती जोडी बनली होती. याच मालिकेमुळे दोघांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. दोघेही घराघरात प्रसिद्ध झाले. राणादा म्हणजे हार्दिक जोशी आणि अंजली बाई म्हणजे अक्षया देवधर दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघेही निरनिराळ्या अंदाजात फोटोशूट करत चाहत्यांची वाहवा मिळवत आहेत. 

पुन्हा दोघांनी त्यांचा एक रॉयल लूकमधला व्हिडीओ शेअर केला आहे. यात दोघांचाही रॉयल अंदाज पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच दोघांनी अशा प्रकारे फोटोशूट केले असावे. याआधीही केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता.

 

अगदी त्याचप्रमाणे त्यांचा हा रॉयल लूक पाहून चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओतला दोघांच्याही रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.  ब्लॅक अँड गोल्डन शेड असलेल्या आकर्षक लेहंग्यामध्ये अक्षया देवधरच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. अक्षयाच्या लेहंग्याला साजेशाच ड्रेस हार्दिक जोशीनेही केलेला पाहायला मिळतोय.

ऑफक्रीन असो किंवा ऑनस्क्रीन त्यांचा प्रत्येक अंदाज चाहत्याना आवडतो.यावेळी दोघांच्या ही लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कधी स्टायलिश तर कधी देसी लूक अशा अंदाजात दोघेही फोटोशूट करताना दिसत आहेत. दोघांचेही एकत्र फोटो पाहून चाहते त्यांन दोघांनीही लग्न करावे अशी इच्छा व्यक्त करताना दिसतात.  

 

दोघांचा हा थाट फोटोशूटसाठी असला तरी  दोघेही लग्न सोहळ्यासाठी सजले आहेत की काय असेच भासत आहेत.दोघेही या पेहरावात खूप सुंदर दिसत आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशी