Join us

​सोनी सबच्या ‘सात फेरो की हेरा फेरी’ मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 11:26 IST

सोनी सबच्या प्राईमटाईम विनोदी मालिका ‘सात फेरो की हेरा फेरी’च्या आगामी भागात प्रेक्षकांना एक मजेशीर अनुभव घ्यायला मिळणार आहे. ...

सोनी सबच्या प्राईमटाईम विनोदी मालिका ‘सात फेरो की हेरा फेरी’च्या आगामी भागात प्रेक्षकांना एक मजेशीर अनुभव घ्यायला मिळणार आहे. लाजोपासून सुटका झाली असे म्हणत गोल्डी (केविन दवे) आता कोणत्याही नात्यात परत अडकण्यासाठी अजिबात तयार नसल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्याच दिवशी रुपल (अॅमी त्रिवेदी) आजारी असून तिला उलट्या होत असल्याचे स्वप्न दिवसाढवळ्या नीतूला (स्वाती शाह) पडणार आहे. हे स्वप्न कोणालाही सांगण्यापासून भूपी (शेखर सुमन) तिला थांबवणार आहे. पण रुपलला खरंच उलट्या होणार आहे आणि तिला होत असणाऱ्या उलट्यांशी नीतू आपल्या स्वप्नाचा संबंध जोडणार असून ती गरोदर असल्याचे सगळ्यांना वाटणार आहे. आपल्याला औषध आणून द्यावे यासाठी रुपल गोल्डीला विनंती करणार आहे. पण गोल्डी यासाठी नकार देणार असून तिला एक यादी दाखवणार आहे. ही सामानाची यादी नीतू भाभीने दिलेली असणार आहे. या यादीत लहान मुलांचे सामान असल्याने ते पाहून नीतू गरोदर असल्याचे रुपलला वाटणार आहे. यामुळे दोन्ही कुटुंब एकमेकांचे अभिनंदन करणार आहेत आणि विशेषतः घरी काम करणाऱ्या मोलकरणींना ही गोष्ट न सांगण्याचे नीतू रुपलला सांगणार आहे. पण घरातील मोलकरीण ते ऐकणार असून आणि नीतू गरोदर असल्याचे संपूर्ण सोसायटीमध्ये सांगणार आहे. दुसऱ्या बाजूला नीतू ही बातमी रुपलच्या पालकांना सांगणार असून ही बातमी आपल्याला तिने स्वतःहून न सांगितल्याने त्यांना वाईट वाटणार आहे आणि यासाठी ते परिमलला जबाबदार ठरवणार आहेत. रुपलच्या बाळासाठी नीतू आणि भूपी पूजा करायचे ठरवणार असून त्याचा मुहूर्त काढण्यासाठी ते पंडितजीकडे जाणार आहेत. याविषयी रुपलची भूमिका साकारणारी अॅमी सांगते, “रुपल आणि नीतू यांच्यामध्ये नक्की को गरोदर आहे यातून निर्माण झालेला गोंधळ खूपच मजेशीर असणार आहे. याआधी कधीही न अनुभवलेले काही विनोदी क्षण प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘सात फेरो की हेरा फेरी’ या मालिकेचे आगामी भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडतील अशी मला खात्री आहे.