लेक माझी लाडकी या मालिकेचे त्रिशतक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 12:19 IST
लेक माझी लाडकी ही मालिका गेल्या वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या ...
लेक माझी लाडकी या मालिकेचे त्रिशतक
लेक माझी लाडकी ही मालिका गेल्या वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या आहेत. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता या मालिकेचे नुकतेच 300 भाग पूर्ण झाले असून हा आनंद मालिकेच्या टीमने केक कापून साजरा केला. खास मालिकांच्या पात्रांचा फोटो असलेला केक बनवण्यात आला होता. केक कापताना या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर आधारित असलेल्या या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेचे 300 भाग पूर्ण झाल्यानंतर या मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळेच वळण मिळणार आहे. मीरा ही आदित्य आणि इरावतीची मुलगी असल्याचे आपल्याला काहीच दिवसांपूर्वीच कळले आहे. यामुळे मालिकेच्या कथानकात आपल्याला खूप बदल पाहायला मिळाले. पण आता जयदेवच्या अपघातामुळे जर्मनीला निघालेले मीरा आदित्य मागे फिरले आहेत आणि थेट जयदेवला भेटायला ते रुग्णालयात आले आहेत. पण रुग्णालयात आल्यानंतर आदित्यचा जयदेवच्या चेहऱ्यावरील ऑक्सिजन मास्ककडे हात गेल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता यापुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.या मालिकेत अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर ही खऱ्या आयुष्यातील जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. प्रेक्षक या जोडीवर भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेत त्यांच्यासोबतच नक्षत्रा मेढेकर, सायली देवधर, विकास पाटील, सुनील बर्वे, प्रदिप वेलणकर यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. या सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.